२९२
निवडणुका निःपक्षपाती होण्याची गरज
रविवार दिनांक २३ डिसेंबर १९५१ रोजी समाजवादी पक्ष व शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन यांच्या वतीने मुंबई येथील चौपाटीवर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत पाच लाखापेक्षा जास्त स्त्री-पुरूषांचा विराट समुदाय हजर होता. या सभेस उद्देशून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
निवडणूक विषयीचा कायदा पास झाल्यावर शुद्ध, स्वतंत्र व पद्धतशीर
निवडणुका होण्यासाठी वर्ष दोन वर्षाचा अवधी हवा होता.
निवडणुकाबाबतचा कायदा मंजूर झाल्यावर एकदोन वर्षात निवडणुका केल्या
असत्या तर काँग्रेसखेरीज इतर पक्षांना एक प्रबळ काँग्रेसविरोधी पक्ष संघटित
करण्यास अवसर मिळाला असता.
१९४६ पासून काँग्रेसपाशी अनियंत्रित सत्ता असतानाही काँग्रेस सरकार
लोकांचे कोणत्याही प्रकारचे कल्याण का करू शकले नाही या माझ्या सवालाचे
नेहरूंनी उत्तर द्यावे. येत्या ५ वर्षात कॉँग्रेस काय करणार याचेही उत्तर त्यांनी
द्यावे. नेहरूंच्या भाषणात याचे उत्तर मिळत नाही, त्यात नुसता शिवराळपणा
असतो, विधायक दृष्टी नसते!
तुरुंगात जाऊन अगर लढा करून काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवले हा भ्रमाचा भोपळा ` आहे. सुभाषचंद्र बोस हेच स्वातंत्र्य मिळविण्यास मुख्यतः कारणीभूत झाले. हिंदी
सैन्याच्या निष्ठेवर ब्रिटिश सरकार आधारले होते. बोस यांनी त्या निष्ठेला
पराकाष्ठेचा धक्का देऊन सैन्यात असंतोष फैलावला आणि आझाद हिंद सेना
स्थापिली, हे पाहून ब्रिटिशांनी काढता पाय घेतला.
` काँग्रेसची १९४२ ची चळवळ अयशस्वी ठरली. १९४२ ची चळवळ मी कधी सुरु केलीच नव्हती असे गांधी म्हणाले होते याचा काँग्रेसवाल्यांना विसर पडला
आहे. ही चळवळ फसली याचा एक पुरावा म्हणजे त्यानंतर गांधींनी वॅव्हेलची
मुलाखत मागितली असता वेंव्हेलने त्यांना स्पष्ट नकार दिला. १९२१ पासून
कोणत्याही व्हाइसरॉयने गांधींचा असा अपमान केला नसावा.
समाजवादी-शेडयूल्ड कास्ट्स् फेडरेशन या समझोत्यावरील वृत्तपत्रांची टीका
मी बारकाईने वाचली पण त्यात काही तथ्य सापडले नाही. या दोन पक्षांच्या
जाहीरनाम्यात एकही दोष दाखवण्याची कोणाचीही छाती झाली नाही. काँग्रेसला
oo
जनता : २९ डिसेंबर १९५१.
>