२३-१२-१९५१ निवडणुका नि:पक्षपाती होण्याची गरज - Page 342

३०२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

यश मिळू नये म्हणून समाजवादी व शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशन यांनी एकमेकांना सहाय्य करण्याचे ठरविले आहे. अर्थात काही प्रश्नाबाबत आमचे मतभेद आहेत. स्वतंत्र उमेदवार माझ्याकडे आले असते तर मी त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला असता. पण आता कोणीही स्वतंत्र उमेदवारांना मते देऊ नयेत.

समाजवांदी-शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशन येत्या फेब्रुवारीत मुंबई कार्पोरेशन काबीज करून मुंबई एक नवे शहर बनवतील असा विश्वास श्री. अशोक मेहता यांनी प्रथम बोलताना व्यक्‍त केला. नेहरू ही समाजवाद्यांच्या मार्गातील एक धोंड असल्याचे मत त्यांनी प्रगट केले. श्री. पुरुषोतम त्रिकमदास व कृष्णा हाथीसिंग यांचीही भाषणे झाली.