११-५-१९५२ सरकारने आथिक बोजा सहन करून धान्याच्या किंमती माफक ठेवाव्या - Page 343

२९३
सरकारने आर्थिक बोजा सहन करून

धान्याच्या किमती माफक ठेवाव्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हैदराबाद येथे दिनांक ११ मे १९५२ रोजी येथील एका कार्यक्रमात म्हणाले, |

भावी योजनांना धक्का लागू नये म्हणून केंद्राने घटकराज्यांना धान्यासाठी दिली जाणारी आर्थिक मदत बंद केली असे सांगण्यात येते. पण सध्याची पिढी तग धरू शकेल इतकी तरी किमान तरतूद सरकारने करावयास हवी. भावी पिढ्यांसाठी सध्याच्या पिढीने आत्मनाश ओढवून घ्यावा हे म्हणणे शहाणपणाचे खास नव्हे. |

आर्थिक मदत बंद करून केंद्र सरकारने मोठी चूक केली आहे. केंद्राने किंवा राज्यसरकारांनी आर्थिक बोजा सहन करून धान्याच्या किंमती जनतेस परवडतील अशा ठेवल्या पाहिजेत.

केंद्राने घटकराज्यांना लागणाऱ्या आवश्यक गोष्टीसाठी मदत करण्याची पद्धत जगातील सर्व राष्ट्रात आहे. भारत सरकारच्या अन्नविषयक धोरणात सुसूत्रता नसल्याने घटकराज्य सरकारांना केंद्राने धान्याबाबत मदत दिलीच [पाहिजे. ]

तत्त्वतः मी सत्याग्रहाविरुद्ध आहे. परंतु समाजवादी पक्षाला सत्याग्रह करण्यासाठी बाध्य करण्यात आले. सरकार आपल्या हेकेखोर वृत्तीने लोकांना घटनाबाह्य पद्धतीचा अवलंब करण्यास भाग पाडते.

जनता : १७ मे १९५२.

वि (वाय) ४११-२१-अ