३१-५-१९५२ अधिकारारूढ पक्षाशी माझी मतभेद असले तरी देशाची नाचक्की कधीही करणार नाही - Page 344

२९४
पक्षाशी माझे मतभेद असले तरी अधिकारारूढ
देशाची नाचक्की कधीही करणार नाही

''भारताची राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी महत्त्वाची कामगिरी केली; त्याबद्दल त्यांना सन्माननीय पदवी देऊन त्यांचा सत्कार करण्याची योजना अमेरिकेतील कोलंबो युनिव्हर्सिंटीने १९५० साली आखली. युनिव्हर्सिटीने तसे त्यांना कळविले. ज्या युनिव्हर्सिटीतून आपण एम्‌. ए., पीएच. डी. या पदव्या १९१५ व १९१७ सालात घेतल्या ती युनिव्हर्सिटी आपल्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन आपला सन्मान करण्यासाठी आपणाला आणखी एक उच्च पदवी, डॉक्टर ऑफ लॉज (1.0.), देऊन आपला सन्मान करीत आहे हे पाहून बाबासाहेबांना फार फार आनंद झाला. आपल्या आयुष्यातील मनात बाळगलेल्या सर्व महत्त्वाकांक्षा आपण जिवापाड परिश्रम करून सफल केल्या, याचे त्यांना समाधान वाटले. परंतु यावेळी, भारताच्या मंत्रीमंडळापुढे मोठ मोठे प्रश्‍न उपस्थित झालेले होते आणि ते घटनात्मक पद्धतीने हाताळून सोडविणे इष्ट होते. या महत्त्वाच्या कामाला बाजूला सारुन कोलंबिया युनिर्व् सिटीची पदवी घेण्याकरता न्यूयॉर्कला जाणे बाबासाहेबांना प्रशस्त वाटले नाही. शिवाय इतक्या लांबचा (सहा हजार मैल) प्रवास करण्याची दगदग आपल्या ढासळलेल्या प्रकृतीमुळे शक्य होईल की नाही याची त्यांना खात्री नव्हती. म्हणून त्यांनी युनिर्व्हसिटीला कळविले की सध्या मला अमेरिकेला येण्यास सवड नाही. युनिर्व्हसिटीचे त्यावेळचे अध्यक्ष जनरल ऐसेनहॉवर हे होते. हेच पुढे अमेरिकेचे अध्यक्ष झाले. बाबासाहेब त्यावेळी गेले असते तर ऐसेनहाँवरच्या हस्ते सदर पदवीदान समारंभ झाला असता. कोलंबिया युनिर्व्हसिटी बाबासाहेबांच्या गैरहजेरीत पदवी देण्यास तयार होती. पण बाबासाहेबांना ते नको होते. आपल्या विद्वत्तेला कारणीभूत झालेल्या युनिरव्हसिटीत स्वतः जाऊन पदवी स्वीकारण्याची त्यांची इच्छा होती. म्हणून एक दोन वर्षात आपण पदवी स्वीकारण्यास येऊ असे त्यांनी युनिर्व्हसिटीला कळविले. शेवटी १९५२ च्या एप्रिलमध्ये, सर्व प्रमुख कामाच्या व्यापातून मोकळे झाल्यावर त्यांनी युनिर्व्हसिटीशी पत्रव्यवहार केला. युनिर्व्हसिटीने पदवीदान समारंभ ५-६-१९५२ ला करण्याचे जाहीर केले. ज्या पंडितांना मानाच्या उच्च पदव्या द्यावयाचे ठरविले होते त्यांची यादी युनिर्व्हसिटीने मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर