३१-५-१९५२ अधिकारारूढ पक्षाशी माझी मतभेद असले तरी देशाची नाचक्की कधीही करणार नाही - Page 345

: . . . अधिकारारूढ पक्षाशी माझे . . . . कधीही करणार माही ३०५

केली. तीत बाबासाहेबांचे नाव होते. ते नाव वाचून त्यांच्या हजारो चाहत्यांनी त्यांना अभिनंदनपर तारा व पत्रे पाठविली. त्या चहात्यांपैकी भारताचे जगद्विख्यात तत्त्वज्ञानी पंडित आणि भारत सरकारचे उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्‌ हे एक होते.

न्यूयॉक येथे एखाद्या निष्णात डॉक्टरांकडून प्रकृति तपासून घेण्याचे बाबासाहेबांनी मनात योजलेले होते. त्यावेळी कोणीही बरोबर नसावे, अशी त्यांची इच्छा होती. आपल्या खर्चाला लागतील इतके डॉलर्स बँकेकडून मिळत नाहीत म्हणून आपण आपल्या पत्नीला न्यूयॉर्कला नेऊ शकत नाही असाही खुलासा बाबासाहेबांनी इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडियाचे वार्ताहर श्री. पोलेक्स यांच्या जवळ केला. * १

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला जाणार

' कोलंबिया विश्वविद्यालय हे अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील सुप्रसिद्ध विश्वविद्यालय आहे व या विशवविद्यालयातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर एम्‌. ए., पीएच. डी. झाले. पीएच. डी. चा प्रबंध परिक्षकांनी पदवीसाठी पसंत केल्यावर तो पुस्तक रूपाने छापल्यावरच पदवी लावायला मिळते असा या विश्‍वविद्यालयाचा दंडक असतानाही डॉक्टरसाहेबांची विद्वता व प्रबंधावरील श्रम लक्षात घेऊन त्यांनाच खास पदवी लावण्याची अगाऊ परवानगी दिली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अमेरिकन जनतेला जगात जास्तीत जास्त खपणाऱ्या सुप्रसिद्ध ' रीडर्स डायजेस्ट ' वगैरे मासिकाद्वारे व वृत्तपत्राद्वारे परिचय झालाच आहे. शिवाय जगातील एक महान विद्वान व ग्रंथकार व प्रभावी वक्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. भारताचे घटनाकार म्हणून त्यांचा अगोदरच डंका वाजला आहे.

अमेरिकेत त्यांची ठिकठिकाणी व्याख्यानेपण होतील व डॉ. महाशयांच्या व्यक्तिमत्त्वाची अमेरिकन जनतेवर खास छाप पडेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना कोलंबिया युनिव्हर्सीटीने एलएल. डी. ची पदवी जी भारताची घटना तयार केल्याबद्दल दिली, ती पदवी स्वीकारण्यासाठी बाबासाहेब शनिवारी सकाळच्या विमानाने अमेरिकेला जाण्याकरिता मुंबईस आले. त्यावेळेस शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनचे अध्यक्ष व जनरल सेक्रटरी हजर होते. तसेच मुंबई राज्य फेडरेशनचे प्रांताध्यक्ष दादासाहेब गायकवाड आणि

सिद्धार्थ कॉलेजचे रजिस्ट्रार श्री. कमलाकांत चित्रे इत्यादी मंडळी हजर होती.

' डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र : चां. भ. खैरमोडे, खंड १० वा, पृ. २८०, २८१ आणि २८३.

एनडब्ल्यू-६९-(भाग-३)-२०-अ