३०६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
बाबासाहेब, माईसाहेब आंबेडकर ह्यांच्या समवेत विमानातून उतरल्यावर प्रांताध्यक्षांनी हार घालून त्यांचा गौरव केला, लगेच ते आपल्या आवडत्या राजगृहात गेले. “ *
''बाबासाहेब, रविवार १-६-१९५२ च्या रात्री अमेरिकेला (न्यूयॉर्क) टी. डब्ल्यू. ए. च्या विमानाने निघणार हे नक्की ठरले, तेव्हा त्यांचे चहाते, अनुयायी, मित्र आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे कर्मचारी यांनी त्यांना शनिवार ३१ मे १९५२ ला रात्री क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे सत्कार-जेवण दिले. डॉ. व्ही. एस. पाटणकर (प्रिन्सीपॉल) आणि श्री. के. व्हि. चित्रे, सेक्रेटरी, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, श्री. प्रभाकर पाध्ये, श्री. बी. एच. राव, श्री. डब्ल्यू. आल्फ्रेड चेअरमन ऑफ दी युनियन ऑफ जर्नलिस्ट वगैरे लोक हजर होते, बाबासाहेबांना परदेशातील विद्यापीठे. उच्च पदवी देऊन त्यांचा सन्मान करतात आणि आमची भारतीय विद्यापीठे, ज्या विद्यापीठातून बाबासाहेब प्रथम पदवीधर झाले, ते मुंबई विद्यापीठही त्यांना उच्च पदवी देऊन सन्मान करण्यास का कू करीत आहे, असे डॉ. पाटणकर म्हणाले. बाबासाहेब न्यूयॉर्कला गेल्यानंतर ते तेथे भाषणे करतील आणि भारतातील अस्पृश्यांच्या प्रश्नाबद्दल भारतीय सरकार किती उदासवाणे धोरण आखीत आहे, याबद्दल आणि इतर राष्ट्रीय स्वरुपाच्या ज्वलंत, प्रचलीत प्रश्नांबद्दल ते आपले विचार प्रदर्शित करून भारतीय सरकारची अमेरिकन लोकांपुढे टर उड़वतील की काय, अशी शंका अनेक लोकांना पडली होती. या शंकेचे निरसन करण्यासाठी त्यांना तशा अर्थाचे काही प्रश्नही विचारण्यात आले. तेव्हा जेवणानंतर बाबासाहेबांनी जे आभारप्रदर्शक भाषण केले, त्यात सदर शंकेचे त्यांनी निरसन केले.
ते.आपल्या भाषणात म्हणाले,
मी स्वभावाने तापट आहे. मी अनेक बड्या व्यक्तींशी त्यांच्या दिखाऊ कार्यावर प्रच्छन्न टीका करून भांडलोही आहे. पण मी आतापर्यंत एकदाही राजद्रोह केलेला नाही. माझ्या देशातील आजची परिस्थिती मी परदेशात कदापि उघड करून सांगणार नाही. देशाचा मान कसा व कोठे ठेवावयाचा हे मला चांगले कळते. आतापर्यंत मी कोणाही परकीय माणसाजवळ माझ्या देशाबद्दल वाईट बोललो नाही. . मग बाहेर जाऊन बोलण्याची शता दूरच. मी अमेरिकेला जाणार हे समजताच काही लोकांच्या मनात धास्ती निर्माण झाली. की तेथे मी सरकारी कारभारावर प्रकाश टाकून देशाच्या स्थितीचे
श जनता : २४ मे १९५२.