सार्वजनिक फंडाचा योग्य वापर करावा ३११
मिळविली आहे. या रकमेपैकी ३६,५३५ रुपये रक्कम जागा खरेदीकरिता खर्च झाली आहे. मात्र आज ही जागा विकावयास काढली तर दीड लक्ष रुपये कोणीही देईल इतक्या महत्त्वाची ती जागा आहे. या रकमेतून दुसरा मोठा खर्च झाला. प्रेसची इमारत बांधण्यासाठी ३५,००० रुपये खर्च झाले आहेत. वरील दोन्ही बाबींसाठी मिळून ७१,५२५ रुपये खर्च झाले असून, बाकीचे ३९,६९३ रुपये ४ आणे ३ पैसे एवढी रक्कम इंपीरियल बँकेत शिल्लक आहे.
आपल्या लोकांनी जी रककम दिली आहे, त्यापैकी, निरनिराळ्या ठिकाणच्या लोकांनी, संस्थांनी व व्यक्तींनी २५ रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम दिली आहे अशांची २५,७०९ रुपये ४ आणे एवढी रक्कम आहे. २५ रुपयांपेक्षा कमी रक्कम देणारांची १,००० रुपये रक्कम आहे व जिचा तपशील समजला नाही अशी ५,००० रुपये रक्कम आहे. रुपयाचा या रकमेचा तपशील का समजला नाही ? तर लोकांनी नेलेली पावती पुस्तके परत आणून दिली नाहीत म्हणून समजला नाही. त्या पावती पुस्तकात आणखीही पैसे जमा झाले असण्याचा संभव आहे व हे जास्त जमलेले पैसे लोकांनी खाल्ले असा संशय उत्पन्न होणे सहाजिकच आहे. तरी हा संशय नाहिसा करण्यासाठी लोकांनी नेलेली सर्व पावती पुस्तके राहिलेल्या पैशासह परत केली पाहिजेत. पुस्तके परत न करणे किंवा जमलेले पैसे न देणे ही फसवणूक आहे व कायद्याने अशा फसवणुकीला [गुन्हा ] [ठरविले ] आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे
आता हां फंड जमवून मुंबईत एक हॉल बांधावा असा माझा विचार आहे. या हॉलचे जे काही उत्पन्न येईल त्या उत्पन्नातून आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाला मदत करता येईल किंवा आणखी काही लोकांच्या हिताची कामे करता येतील. ह्या किंवा पुढच्या वर्षी हॉल बांधून पुरा झाला पाहिजे.
हा हॉल बांधण्यास पावणे दोन लाख रुपये खर्च येईल असा अंदाज
आहे. आज आपल्याजवळ इंपीरियल बँकेत ३९,६९३ रुपये ४ आणे ३ पैसे एवढी
रककम आहे. सध्या इमारतीची जागा लोकांना भाड्याने वापरण्यासाठी दिली
आहे. तेव्हा ते काही उत्पन्न मिळते. परंतु हॉल बांधावयाचा झाल्यास या
लोकांना नोटिसा देऊन काढावे लागेल. त्यावेळी हे उत्पन्न बुडेल.
हॉल बांधण्यासाठी १ लाख रुपये खर्च येईल व हॉलमध्ये फर्निचर ठेवणे व
इतर सोयी करणे यासाठी पाऊण लाख रुपये लागतील असा माहितगार लोकांचा
अंदाज आहे. कदाचित थोडी कमी किंवा थोडी जास्त रक्कम खर्च होण्याचा A, CNT काका काकाला याशा संभव आहे
तेव्हा एवढी रक्कम कशी उभी करावयाची हा प्रश्न आहे. मला माझ्या ६० व्या.
वाढदिवसानिमित्त ६०,००० रुपये देण्याचे ठरविले आहे त्यापैकी आतापर्यंत