१४-७-१९५२ सार्वजनिक फंडाचा योग्य वापर करावा - Page 352

३१२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

काहीतरी अकरा बारा हजार रुपये जमलेत असे मला समजले आहे. हीरक महोत्सवाची प्रतिज्ञा तुम्ही केली आहे ती पुरी करण्याची ईर्षा तुम्ही बाळगिली पाहिजे नाहीतर ' बोलाचीच कढी, बोलाचाच भात, जेऊनीया तृप्त कोण झाला ?' असे होता कामा नये. १२ हजार रुपये तुम्ही जमविले आहेत. तर बाकीचे ४८ हजार रुपये तुम्ही उभे केले पाहिजेत. तुम्ही ६० हजार रुपये मला दिले तर, मी ते काही माझ्या खिशात घालणार नाही. हॉलसाठीच मी ते देणार आहे. माझ्या हयातीत हे हॉलचे कार्य झाले पाहिजे अशी माझी फार इच्छा आहे. तरी तुम्ही पैसे जमविण्याच्या कामाला लागा.

काही लोक सार्वजनिक कामाला पैसे देतात. परंतु जे मध्यस्त असतात ते लोक हा पैसा मधल्या मध्येच गडप करतात आणि खातात. तेव्हा आपण दिलेला पैसा ज्या कामासाठी दिला ते काम होईल की नाही याबद्दल संशय असल्यामुळे काही लोक पैसेच देत नाहीत.

असे असेल तर तुम्ही पैसे माझ्याकडे आणून द्या. मी ते स्वीकारावयास तयार आहे. आतापर्यंत. मी स्वतः कधीही पैसा घेतला नाही. आता मात्र, या कामासाठी पैसे घेण्याची माझी तयारी आहे. तरी ज्यांना कोणाला पैसे माझ्याकडेच आणून द्यावयाचे असतील त्यांनी ते दररोज संध्याकाळी ७ते ८ च्या दरम्यान माझ्या बंगल्यावर (राजगृह दादर) आणून द्यावेत. तेथे श्री. उपशाम मास्तर तुम्हाला पावती देतील. ते या फंडाचे एक ट्रस्टी आहेत व हिशेबाचे कामही त्यांच्याकडेच आहे. माझा मुक्काम महिना दीड महिनाच मुंबईत आहे. मी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई सोडून दिल्लीस जाणार आहे. तरी मी जाण्यापूर्वीच लोकांनी पैसे माझ्याकडे आणून

द्यावेत.

तुम्ही मला साठ हजार रुपये दिले तर जवळ जवळ १ लाख रुपये आपल्याजवळ तयार होतील. तरीही हॉल बांधण्यासाठी आपणास आणखी पाऊण लाख रुपये कर्ज काढावे लागणार आहे व ते मी काढणार आहे. हॉलच्या सव्वा दोन, अडिच लाख रुपयांच्या तारणावर ते मला कोणीही देऊ शकेल. मात्र मागाहून हे पाऊण लाख रुपयेही तुम्हास फेडावे लागणार आहेत. मुंबईत हॉलला किती मागणी आहे हे तुम्ही जाणताच. दरमहा १,००० रुपये हॉलचे उत्पन्न सहज येऊ शकेल. दरसाल १५ ते २० हजार रुपये फेडल्यास थोड्याच वर्षात हॉल आपल्या मालकीचा होऊ शकेल. दुसरी एक हितगुजाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ' जनता ' पत्रासाठी एक ट्रस्ट असावा असे मला वाटते. ' जनतेला ' काही तूट आली तर ती या ट्रस्टच्या पैशातून भरून काढता