१४-७-१९५२ सार्वजनिक फंडाचा योग्य वापर करावा - Page 353

सार्वजनिक फंडाचा योग्य वापर करावा ३१३

यावी. आपल्याला वर्तमानपत्राची अत्यंत जरूर आहे. आपल्यावर होणारे जोर, जुलूम व अत्याचार आणि गाऱ्हाणी जनतेला कळविण्यासाठी आपल्याला ' जनता ' वर्तमानपत्र चालविणे आवश्यक आहे. या कामासाठी मी निराळा पैसा जमा केला आहे. ते ३२,००० रुपये (बत्तीस हजार) मी तूर्त आपल्या हॉलसाठी बिनव्याजी कर्ज म्हणून देण्यास तयार आहे. मात्र पुढे सदर पैसे तुम्ही मला परत दिले पाहिजेत. माझ्याकडे तीन प्रकारांनी पैसे जमा आहेत (१) इमारत फंडाचे, (२) जनतेचे व (३) फेडरेशनचे पैसे. हे मला निरनिराळ्या प्रांतातून मिळालेले आहेत व ते फक्त राजकारणासाठीच खर्च करावयाचे आहेत. म्हणून ते या कामासाठी मला देता येत नाही.

पूर्वीचा इमारत फंड, मुंबई सरकारच्या विश्वस्त कायद्यान्वये शेड्यूल्ड कास्ट्स्‌ इंप्रुव्हमेंट ट्रस्ट, मुंबई या नावाने रजिस्टर केला आहे. तेव्हा या पैशाच्या बाबतीत काही अफरातफर होईल ही काळजी बाळगण्याचे कारण नाही. कारण सरकारकडून दरसाल हा हिशेब तपासला जाणार आहे.

मुंबईत सर्व लोकांच्या मालकीचे हॉल आहेत. मुंबईत घरकाम करणाऱ्या तिरळे कुणबी यांनीही परळला ' वाघे हॉल ' नावाचा स्वत:च्या मालकीचा हॉल बांधला आहे. ते आपल्या मानाने फार थोडे लोक आहेत. असे असूनही त्यांनी स्वतःच्या मालकीचा हॉल बांधला आहे. या गोष्टीची इर्षा धरून तुम्ही ताबडतोब कामास लागले पाहिजे. मी परत सांगतो की पावती पुस्तके परत न आल्यामुळे जे जे हिशेब पुरे झाले नाहीत त्या सर्व हिशेबाची पावती पुस्तके व गोळा झालेला पैसा तुम्ही आणून दिला पाहिजे. जे लोक तसे करणार नाही त्यांची गय केली जाणार नाही.