मी संघर्ष करून . . . . स्वाभिमान निर्माण केला आहे ३१७
वीस पंचवीस वर्षापूर्वी जळगाव येथे दरवर्षी ब्राह्मण भोजने घालण्याची ` प्रथा होती. ती भोजने झाल्यावर त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या ते उकिरड्यावर
टाकीत असत. तेथे आमचे अस्पृश्य बसत असत आणि त्या पत्रावळ्या गोळा
करून उकिरड्यावरून नेत असंत. काहीकाही वेळा त्यांच्यात या उष्ट्या
पत्रावळ्याबद्दल मोठे तंटे माजत असत. या अवस्थेत अस्पृश्य समाज
होता. केवळ तो माणुसकीहीन बनला होता असे नव्हे तर तसे मानण्यात तो
धन्यवाद मानीत होता. मानवी अधःपाताची ती कमाल होती.
मी गेली पंचवीस वर्षे झगडून त्यांना सर्वस्वी सुखी करू शकलो नसलो तरी त्यांच्यात जाज्वल्य स्वाभिमान निर्माण केला आहे. अन्यायाविरुद्ध ` झगडण्याचे सामर्थ्य निर्माण केले आहे. हे काही साधे-सुधे काम नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना राजकीय हक्क प्राप्त करून देण्याची. आपल्याला . पूर्वी दिल्ली कॅबिनेटमध्ये झाडूवाल्याचेसुद्धा काम मिळत नसे. आज २५
वर्षानंतर तेथे अस्पृश्य 'समाजाचा मंत्री नेऊन बसविला आहे.
तिसरी गोष्ट शिक्षण क्षेत्रातील. २५ वर्षांपूर्वी अस्पृश्य समाजाला शिक्षणाची सारी दारे बंद होती. ती मी उघडी करून दिली आहेत. अस्पृश्य मुलांना
उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सरकारशी झगडून स्कॉलरशिप्स व फ्रिशिप्स
मिळवून दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर यांना ' आपले म्हणता ' येईल असे
प्रगतिमान “ सिद्धार्थ “ नावाचे कॉलेज मी यांच्यासाठी काढून दिले आहे. या
कॉलेजात ३०० अस्पृश्य विद्यार्थी आहेत. दरवर्षी त्यांना २,००० रुपयाच्या
स्कॉलरशिप्स दिल्या जातात. यांना राहाण्यासाठी जोडूनच बोर्डिंग काढले
आहे. तसेच औरंगाबादला याच कॉलेजची शाखा उघडली आहे.
आता एक गोष्ट करण्याची माझ्या मते अपूरी राहिली आहे. ती म्हणजे
मुंबई शहरात आपल्या समाजाच्या मालकीचा एक हॉल बांधण्याचा माझा हेतू फार
भिन्न आहे. मुंबईत इतर हॉल आहेत. तेथे नाटके, तमाशा वगैरे खेळ
होतात. केवळ तशा तऱ्हेच्या करमणुकी करण्यासाठी हॉल बांधण्याचा माझा हेतू
नाही.
हा हॉल बांधण्यात माझा एक महत्त्वाचा उद्देश आहे. अस्पृश्य समाजावर
हरघडी स्पृश्य हिंदुंकडून खेड्यांवर अन्याय होत आहेत. आजच मला एक पत्र
आले आहे की, औरंगाबादच्या एका खेड्यात अस्पृश्य समाजाच्या वस्तीभोवती
स्पृश्यांनी तारेचे कुंपण घालून त्यांना कोंडून टाकून त्याचे जीवन असह्य केले
आहे. अशा एक ना दोन हजारो तक्रारी प्रत्यही माझ्याकडे येत आहेत.
वि (वाय) ४११-२२