२८-९-१९५२ सार्वजनिक पैशाचा अपहार करण्यासारखे नीच कृत्य दुसरे नाही - Page 359

२९८
सार्वजनिक पैशाचा. अपहार करण्यासारखे
नीच कृत्य दुसरे नाही

(१) शे. का. फेडरेशन, (२) शे. का. इंप्रुव्हमेंट ट्रस्ट, (३) म्यु. कामगार संघ,

(४) महार ज्ञाति पंचायत व (५) समता सैनिक दल या पाच संस्थांतर्फे रविवार

दिनांक २८ सप्टेंबर १९५२ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नरे पार्कवर

मुंबईतील अस्पृश्य जनतेचे जाहीर संमेलन घेण्यात आले होते. या संमेलनात

मुख्यतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण हाच मुख्य कार्यक्रम होता. साडेपाच

वाजण्यापूर्वी अस्पृश्य स्त्री-पुरूषांनी नरे पार्क अक्षरशः फुलून गेलेला होता. बरोबर

साडेपाच वाजता, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माईसाहेब आंबेडकरांसह ` संमेलनाच्या ठिकाणी आले. सर्व जनतेने मोठ्या उत्कंठेने व अंतःकरणपूर्वक

टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर व व्यासपीठाच्या बाजूस

मुंबईतील सर्व निवडक मंडळी बसलेली होती. बॅ. कांबळे, श्री. बी. सी. कांबळे, एम.एल.ए., श्री. बोराळे, अध्यक्ष, म्यु. कामगार संघ; श्री. भंडारे, एम. ए.,

एल. एल. बी., श्री. जे. जी. भातनकर, श्री. शां. अ. उपशाम, सेक्रेटरी शे. का.

ट्रस्ट; श्री. आर. जी. खरात अध्यक्ष, शे. का. फेडरेशन इत्यादि मंडळींचा

|

उल्लेख करता येण्यासारखा आहे. |

प्रथम श्री. उपशाम यांनी आजच्या संमेलनाचा हेतू समजावून दिला. ते

म्हणाले, आज पुष्कळ दिवसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य जनतेत

दिसत आहेत. यापूर्वीच त्यांना आपली सर्वांची भेट घ्यावयाची होती परंतु

पावसामुळे त्यांना इतके दिवस दम धरावा लागला. आज पाच संस्थांतफे हे

जाहीर संमेलन घेण्यात येत आहे. परंतु या पाच संस्था अशा काही अगदी अलग

अलग नाहीत. एका झाडाच्या पाच फांद्या असाव्यात तशी त्यांची स्थिती

आहे. या फांद्यांचा एकच बुंधा आहे व त्यातूनच त्यांना जीवनरस मिळत

असतो. अस्पृश्य चळवळीतील निरनिराळ्या उद्देशांसाठी जरी या संस्था

निघाल्या असल्या तरी त्या सर्वांचा आधार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकच

आहेत. तेव्हा आजच्या प्रसंगी भाषण करण्यास मी त्यांना आपण सर्वात विनंती

करीत आहे.

जनता : ४ ऑक्टोबर १९५२.

ननि (वाय) ४११-२२-अ