२८-९-१९५२ सार्वजनिक पैशाचा अपहार करण्यासारखे नीच कृत्य दुसरे नाही - Page 361

सार्वजनिक पैशाचा अपहार . . . . . . . कृत्य दुसरे नाही ३२१

आज दसरा आहे. दसरा हा सोन्याचा दिवस आहे. मात्र सोने तुमच्या

जवळही नाही आणि मजजवळही नाही. आजचा प्रसंग मात्र सोन्यासारखा आहे. येथून जाण्यापूर्वी तुम्ही सर्वानी ' इमारत फंड ' जमविण्यासाठी सोन्यासारखी प्रतिज्ञा केली पाहिजे. तुमच्या प्रतिज्ञेला कस लावला तर ती १०० नंबरीच ठंरली पाहिजे

माझी सर्व जनता गरीब आहे. मात्र तिच्यावर माझा विशवास आहे. ती गरीब असली तरी ती माझ्या हाकेला ओ दिल्याशिवाय राहाणार नाही, याबद्दल माझी खात्री आहे. मात्र, शिकल्या सवरलेल्या लोकांना याप्रसंगी मला दोन शब्द सांगावयाचे आहेत. गरीब जनतेने दिलेल्या पैशाचा हिशेब त्यांनी व्यवस्थित ठेवावा व एका पैचीही अफरातफर होणार नाही याची त्यांनी काळजी बाळगावी. . सार्वजनिक पैशाचा हिशेब व्यवस्थित ठेवून तो जनतेस वेळोवेळी दाखविणे यासारखे पवित्र कार्य दुसरे नाही. तसेच सार्वजनिक पैशाचा अपहार करणे यासारखे नीच कृत्य दुसरे नाही.

माझा माझ्या समाजातील सुशिक्षितांवरील विश्‍वास उडाला आहे. मला इमारत फंडाचा.' सर्व हिशेब हवा. सर्वसामान्य गरीब आणि अशिक्षित

- माणसावरच आता माझा सर्व भरवसा आहे.

मी मुंबईत असेपर्यंत लोकांनी माझ्या बंगल्यावर पैसे आणून द्यावेत व मी दिल्लीस गेल्यावर श्री. शांताराम अनाजी उपशाम, सेक्रेटरी, शेड्यूल्ड कास्ट्स्‌ इप्रुव्हमेंट ट्रस्ट, मुंबई यांच्याकडे त्यांनी द्यावेत.

सध्या ते माझ्या बंगल्यावर पैसे घेण्याचे काम करतात. मी दिल्लीस

गेल्यावर त्यांचे ऑफिस भारत भूषण प्रिटींग प्रेसमध्ये राहील, असे सांगून त्यांनी

आपले भाषण संपविले.

शेवटी श्री. जे. जी. भातनकर यांनी बाबासाहेब व माईसाहेब यांचे आभार मानून

त्यांना सर्व संस्थांतर्फे पुष्पहार घातले. सर्वांचे आभार मानल्यावर सभेचे काम

संपले.

७७ ७