१५-१२-१९५२ भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. ह्यासंबंधी विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे - Page 362

२९९
भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते

ह्यासंबंधी विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे

एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये सोमवार, दि. १५ डिसेंबर १९५२ रोजी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण आयोजित करण्यात आले

होते. ते आपल्या भाषणात म्हणाले,

या कॉलेजात मी जी चार वर्षे अध्ययन केले तो काळ मोठा गोड स्मृतींचा नाही. मी या कॉलेजातील पहिलाच अस्पृश्य विद्यार्थी होतो. माझे मन सवर्ण विद्यार्थ्यांत मिसळायला धजत नव्हते. म्हणजे भीतीमुळे नव्हे, मलाच ते मिसळणे आवडत नव्हते. कारण माझा पोषाख इतरांसारखा झकपक नव्हता व त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहाणेच मला आवडत 'असे. आजकालच्या विद्यार्थ्यांसारखे माझे कॉलेज जीवन तेवढे उत्साही नव्हते याबद्दल मी कुणालाच दोष देत नाही. माझ्या शिक्षकांनी व विद्यालय चालकांनी मला ठीक वागवले. त्यावेळच्या विद्यार्थ्यांत आणि आजच्या विद्यार्थ्यांत जमीन अस्मानाचा फरक आहे.

आजचे विद्यार्थी ज्या विद्यापीठाचे शिक्षण घेतात त्याच्या कारभाराकडे मुळीच लक्ष घालीत नाहीत. विद्यार्थ्यांनी काय शिकावं हे विद्यापीठ ठरवित असले तरी आपल्या बौद्धिक विकासाला आपण शिकतो ते खरोखरच पोषक व आवश्यक आहे की नाही, हेही प्रत्येक विद्यार्थ्याने पाहिले पाहिजे. त्यांच्या भावी जीवनाची उभारणी याच ठिकाणी होत असते. तो राष्ट्राचा आदर्श नागरिक होणार की, त्याचे जीवित विफल होणार हेही शिक्षणक्रमच ठरविणार असल्यामुळे विद्यापीठाच्या प्रत्येक हालचालीवर विद्यार्थ्यांचे कटाक्षाने लक्ष पाहिजे. पण आजचे विद्यार्थी त्यादृष्टीने अगदी बेपर्वा असतात.

उच्च विद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची कॉलेजची चार वर्षे संपून जातात आणि विद्यापीठाच्या पदव्या घेऊन ते बाहेर पडतात. पण त्यांना प्लेटो, बेकन, नित्से, स्पिनोझा यासारख्या महाश्रेष्ठ तच्चज्ञान्यांच्या तत्त्वज्ञानासंबंधी

MS

ER RMN य य जनता : २० डिसेंबर १९५२.