१५-१२-१९५२ भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. ह्यासंबंधी विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे - Page 363

भावी जीवनाची उभारणी . . . . सजग राहिले पाहिजे ३२३

अवाक्षरही माहिती नसते. ज्या तत्त्वज्ञानाने नव्या जगाची उभारणी केली किंबहुना आजचा नव मानव आपल्या प्रत्येक दैनंदिन जीवनात ज्या तत्त्वज्ञानावर जगत आहे त्या थोर तत्त्वज्ञानाची उपेक्षा आजच्या पदवीधरांकडून व्हावी यापेक्षा अति लाजिरवाणी गोष्ट कोणती ? याउलट आजची विद्यापीठे जेम्स आणि चार्लस यांचे तत्त्वज्ञान विद्यार्थ्याच्या माथी जबरीने लादत आहे. विद्यार्थ्यांनी या गोष्टी स्वतःच ओळखायला पाहिजेत आणि आपल्याला योग्य शिक्षण पाहिजे याची हाकाटी त्यांनी केली पाहिजे. |

मानवी जीवनातील वैचारिक आणि नैतिक मूल्ये कधीच स्थिर राहिली नाहीत. ती कालमानाप्रमाणे ' प्रत्यही बदलत राहातात. नुसती बदलतातच नव्हे तर ती प्रगत होत जातात. भारतीय विद्यार्थ्यांनीही या नव्या नव्यां निर्माण होणाऱ्या जीवनमूल्यांची दखल घेतली पाहिजे आणि आपणही ती आचरणात आणण्यास सिद्ध राहिले पाहिजे. हे नवे तत्त्वज्ञान आपल्या विद्यादायी संस्था ` आपल्या शिक्षणक्रमात घालतात की नाही याकडेही पाहिले पाहिजे.

पण खेदाची गोष्ट ही की, आधुनिक विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि वैचारिक पातळी रोडावत खाली चाललेली आहे. भूतकालातील मानवी प्रज्ञेशी तुलनाच होऊ शकत नाही. ही बौद्धिक पातळी का खाली घसरली ह्याचा विद्यार्थ्यांनी विचार करणे आवश्यक आहे आणि या परागंतीचे कारण अगदी स्पष्ट आहे. आजंचा विद्यार्थीवर्ग भूतकालीन प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत यांच्या तत्त्वज्ञान व वाङ्मयकृतींचा अभ्यास मन लावून करीत नाही.

उलटपक्षी, आजचा विद्यार्थीवर्ग फुटबॉल, क्रिकेट आणि पोकळ राजकारणात दंग असतो. विद्यार्जन याला एक मोठा अर्थ असतो. आपली प्राचीन गुरुकुले एकांतात विद्या शिकवीत असत. रानावनातून ही विद्यापीठे प्रस्थापित झाली होती त्याचे मुख्य कारण असे की, त्यांना विद्येच्या अभ्यासाने नवी दृष्टी यावी, या दृष्टीतून त्यांनी खऱ्या जीवनमूल्यांचा शोध व बोध [घ्यावा. ] पण आजचे विद्यार्थी क्रीडेच्या आणि राजकारणाच्या फंदात [ती ] [दिव्य ] [दृष्टी ] [प्राप्त ] [करून ] [घेतच ]

नाही.

हिंदी विद्यालयातील शिक्षक मोठ्या कष्टाने, केवळ अंगिकारले आहे म्हणून विद्यादान करीत असतो. स्वयंप्रेरणेने हे विद्यादान होत नाही. शिक्षकाला लागणारी अंतःस्फूर्ती, विद्यादानाची हौस आणि त्यासाठी करावा लागणारा . अव्याहत व्यासंग या सर्वांचीच त्यांच्याकडे वानवा असते. किंबहुना अध्यापक