१५-१२-१९५२ भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. ह्यासंबंधी विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे - Page 364

३२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पेशाला जे नोकरीचे हिडीस स्वरूप आले आहे आणि तास भरून काढण्यासाठीच त्याला शिकवावे लागत असल्यामुळेच अध्यापक वर्गामध्ये हे शैथिल्य निर्माण झाले असावे !व त्यामुळे अध्यापकही विद्यार्थ्यांना विचारप्रवर्तक ज्ञान पाजण्यास असमर्थ झाले आहेत.

विद्यालयांनी आपल्या फी भरमसाठ वाढविल्या आहेत. या फो अशाच वाढू लागल्या तर विद्यार्थ्यांच्या भावी जीवनावर त्यांचा निश्चितपणे अनिष्ट परिणाम होईल. त्यांचे भवितव्य भयाण होईल. केबन म्हणतो, ' Knowledge is ९0७ ' ज्ञान ही महान शक्ती आहे, विद्यार्थी वर्गाला जर या ज्ञानाची कास धरून आपल्या देशाचा विकास आणि उद्धार करून घ्यायचा असेल तर त्यांनी विद्यापीठाच्या कारभारात जरूर लक्ष घालून आपल्या हक्कांसाठी संतत झगडत

राहिले पाहिजे.

विद्यापीठाचा कारभार हाकणारी सिनेटमध्ये बसलेली ही क्रियाशून्य जुनी धेंडे गेल्याशिवाय विद्यापीठाचा कारभार सुधारणार नाही. उलट या जुन्या धेंडांकडूनच विद्यापीठात उघड लाचलुचपतीचे प्रकार सुरू आहेत. सिनेटमधल्या सभासदाकडील शिक्षणसाहित्य किंवा शास्त्रीय उपकरणे खरेदी करणाच्या अटीवरच एखाद्या नव्या शाळेला किंवा कॉलेजला मान्यता मिळते. म्हणून विद्यार्थ्यांनीच विद्यापीठाचा कारभार जातीने पाहिला पाहिजे व आपले हित साधले

पाहिजे.