आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३२६
होती. हॉल न्यायाधिश, मॅजिस्ट्रेट, वकील व बाहेरची मंडळी उपस्थित प्रेक्षकांनी खच्चून भरला होता. हॉलच्या बाहेर किती तरी श्रोते उभे होते. अध्यक्षस्थानी सेशन्स जज्ज श्री. पी. सी. भट हे होते. अध्यक्षांच्या भाषणानंतर श्री. सेठना व तुळपुळे या सेवानिवृत्त वकिलांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुष्पहार घालून सत्कार केला. नंतर ज्युडिशिअल क्लार्क्स असोसिएशन तर्फे डॉ. आंबेडकरांना हार घालण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांचे ते भाषण ५ ते ७ वाजताच्या
दरम्यान झाले''.*
ते आपल्या भाषणात म्हणाले,
''आजच्या या संध्याकाळी मी आपणासमोर ज्या विषयावर बोलणार आहे तो
विषय माझ्या शब्दात सांगावयाचा म्हणजे ' लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्वावर्ती शर्ती ' असा असेल, कोणत्याही प्रकारचा अडथळा नसताना लोकशाही शासन व्यवस्था कार्यरत व्हावी यासाठी ज्यांचे अस्तित्व आवश्यक आहे अशा
पूर्वावर्ती शर्ती कोणत्या आहेत ? याच विषयावर काही विचार मांडण्याचा माझा
मानस आहे.
विषयाला प्रत्यक्ष सुरूवात करण्याच्या अगोदर मी ज्याला विषयाची मांडणी म्हणतो त्याला पूरक असे काही प्राथमिक विचार मी आपणासमोर प्रथम सांगणार आहे. मला प्रस्तुत करावयाचा पहिला प्राथमिक विचार असा आहे की, लोकशाहीचे प्रकार नेहमीच बदलत आले आहेत. आपण लोकशाही संबंधाने बोलतो परंतु लोकशाही नेहमीच सारखी नसते. ग्रीक लोक अथेनिअन लोकशाही _ संबंधाने बोलले. परंतु प्रत्येकाला कल्पना आहे की अथेनिअन लोकशाही ही आधुनिक लोकशाहीपासून इतकी भिज्न आहे की जितके लोणी खडकापासून भिन्न असते. अथेनिअन लोकशाहीमध्ये अशा लोकांचा अंतर्भाव होता की ज्यांच्यामध्ये ५० टक्के लोक गुलाम होते, फक्त ५० टक्केच लोक स्वतंत्र होते. जे ५० टक्के लोक गुलाम होते त्यांना शासनात कसलेच स्थान नव्हते. म्हणूनच आपली लोकशाही अथेनिअन लोकशाहीपासून निश्चितच भिन्न आहे. एक प्राथमिक विचार म्हणून दुसऱ्या एका गोष्टीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. ती म्हणजे एकाच देशामध्ये लोकशाही नेहमीच सारखी नसते. आपण इंग्लंडचा इतिहास विचारार्थ घ्यावा. कोणीही असे म्हणू शकत नाही की, सन १६८८ मधील इंग्लिश क्रांतीच्या अगोदरची इंग्लीश लोकशाही,त्या क्रांतीनंतरच्या लोकशाही सारखीच होती. तसेच, असे सुद्धा कोणी म्हणू शकत नाही की, पहिला सुधारणा कायदा पास झाला त्या काळातील म्हणजे सन १६८८ व १८३२ या सालात अस्तित्वात
१ जनता : २७ डिसेंबर १९५२.