लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्वावर्ती शती ३२७
असलेली लोकशाही तो कायदा पास ( सन १८३२ ) झाल्यानंतरच्या परिणत झालेल्या लोकशाही सारखीच होती. लोकशाहीचे स्वरूप सारखेच बदलत राहते.
तिसऱ्या एका गोष्टीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो आणि ती म्हणजे लोकशाहीचे केवळ स्वरूपच बदलत नाही तर लोकशाहीच्या हेतुमध्ये देखील वेळो- वेळी बदल होत जातो. आपण प्राचीन इंग्लीश लोकशाही विचारात घ्या; त्या लोकशाहीचा हेतू काय होता? राजाला पायबंद घालणे, तसेच आपण ज्याला कायद्याच्या भाषेत परमाधिकार म्हणतो त्या अधिकारांच्या अंमलबजावणीपासून . राजाला परावृत्त करणे हाच लोकशाहीचा हेतू होता. राजाची मजल त्यावेळी असे सांगण्यापर्यंत गेली होती की, “ कायदा करणारी एक संस्था म्हणून जरी संसद अस्तित्वात असली तरी ' मी ' एक राजा म्हणून मला कायदा करण्याचा परमाधिकार आहे आणि माझाच कायदा सर्वश्रेष्ठ आहे.” राजाच्या या स्वयंसत्ता पद्धतीमुळेच लोकशाही अस्तित्वात येऊ शकली.
सध्या लोकशाहीचा हेतू काय आहे? राजाच्या स्वयंसत्ताकपद्धतीला जास्तीतजास्त पायबंद घालणे हा विद्यमान लोकशाहीचा हेतू नसून जनसामान्यांचे कल्याण करणे हाच तिचा हेतू आहे. हाच लोकशाहीच्या हेतूमधला लक्षणीय बदल आहे आणि म्हणून माझ्या विषयाला मी जे शीर्षक दिले आहे त्यामध्ये आपल्या हे दृष्टोत्पत्तीस येईल की, "' विद्यमान लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्वावर्ती शर्ती “ ह्या शाब्दप्रयोगाचा मी जाणीवपूर्वक उपयोग केला आहे.
लोकशाही म्हणजे आपण काय समजतो? विषयाला सुरवात करण्याच्या अगोदर आपणाला या विषयाची स्पष्ट कल्पना आली पाहिजे. आपणास याची जाणीव आहे की, राज्यशास्त्राच्या लेखकांनी, तत्त्वज्ञानी आणि समाजशास्त्रज्ञ अशासारख्या पुष्कळशा लोकांनी लोकशाहीची व्याख्या केली आहे. माझ्या मुद्याचे स्पष्टीकरण व्हावे या उद्देशाने मी फक्त दोनच व्याख्यांचे आपणासमोर विवेचन करणार आहे. आपणापैकी किती लोक वाल्टर बेगहॉट यांनी ब्रिटिश संविधानावर लिहिलेल्या प्रसिद्ध ग्रंथाशी परिचित आहेत याची मला कल्पना नाही. परंतु तो ग्रंथ म्हणजे लोकशाहीचा सत्य आराखडा सांगण्याचा पहिलाच आधुनिक प्रयत्न आहे. वाल्टर बेगहाँट यांचा उपरोक्त ग्रंथ जर आपण पाहिला असेल तर त्याने 'चर्चेतून चालणारे शासन' अशी लोकशाहीची व्याख्या केल्याचे आपणास आढळेल. याप्रमाणे त्याने लोकशाहीची व्याख्या केली आहे.