आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३२८
लिंकनचे. दक्षिणेकडील दुसरे उदाहरण घ्या आणि ते म्हणजे अब्राहम
प्रसिद्ध भाषणात राज्यांच्या विजयानंतर गेट्टीसबर्ग येथे केलेल्या त्याने लोकशाहीची अशी व्याख्या केली आहे की, 'लोकांचे, लोकांनी व लोकांच्यासाठी चालविलेले शासन म्हणजे लोकशाही'. ठीक आहे! लोकशाही म्हणजे काय याची लोकांना जाणीव करून देण्यासाठी दुसऱ्या पुष्कळशा व्याख्यांची यामध्ये भर घालता येईल. मी स्वतः व्यक्तीगत लोकशाहीची एका वेगळया मार्गानी व्याख्या करतो आणि मला असे वाटते की, ती पुष्कळशी सत्य आहे. लोकशाहीची माझी व्याख्या अशी आहे की, 'रक्तपाताशिवाय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतीकारी बदल घडवून आणणाऱ्या शासन व्यवस्थेच्या प्रकारास आणि पद्धतीस लोकशाही म्हणतात.' लोकशाहीची ही माझी व्याख्या आहे.. लोकशाही, जर ती चालविणाऱ्या लोकांना, लोकांच्या सामाजिक व आर्थिक जीवनात मूलभूत बदल घडवून आणण्यासाठी सहाय्यभूत होत असेल आणि लोक हा बदल रक्तपाताचा आश्रय न घेता स्वीकारण्यास तयार असतील तर त्या ठिकाणी लोकशाही आहे असे मी मानतो. लोकशाहीची ही खरी कसोटी आहे. कदाचित
ही कठोर कसोटी असेल परंतु ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वस्तुच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करता त्यावेळेस तुम्ही ती कठोर कसोटीस लावता. अशाप्रकारे
कोणत्याही परिस्थितीत, आजच्या माझ्या व्याख्यानाच्या संदर्भात मी लोकशाहीची व्याख्या प्रस्तावित करीत आहे. आणि मग अशी ही लोकशाही कशी यशस्वी
होईल हाच माझ्या भाषणाचा मुख्य विषय आहे. दुर्दैवाने ज्यांनी लोकशाही
या विषयासंबंधी लिहीले आहे त्यांनी या विषयावर कोणतीही आग्रही मते मांडलेली
नाहीत. या आग्रही मतावरून लोकशाही यशस्वी करण्याच्या पूर्वावर्ती शर्तीची त्यांच्या अभिप्रायाप्रमाणे एक निश्चित कल्पना आली असती. यासाठी एखाद्याला इतिहास वाचावा लागेल आणि इतिहासाच्या या वाचनाचा परिणाम म्हणून जगातील वेगवेगळ्या भागात ज्या ठिकाणी लोकशाही राबविली जात आहे त्या ठिकाणच्या लोकशाही जीवनाच्या बिघाडाचा शोध घ्यावा लागेल.
माझ्या मताप्रमाणे लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाची पहिली शर्त म्हणजे समाजामध्ये भयानक विषमता असता कामा नये, पिळलेला वर्ग असता कामा नये, दडपलेला वर्ग असता कामा नये. ज्याला सर्व विशेषाधिकार आहेत व जो केवळ ओझ्याचा बैल आहे असे समाजामध्ये वर्ग असता कामा नयेत. समाजाच्या या व्यवस्थेत, पद्धतीत व विभाजनात रक्तरंजित क्रांतिची बीजे असतात आणि कदाचित हे दुखणे नाहीसे करणे लोकशाहीला अशक्य होईल. गेट्टीसबर्ग येथील पूर्वी उल्लेखिलेल्या भाषणात लिंकनने असे म्हटले होते की, “ढासळलेले