लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्वावर्ती शर्ती ३२९
घर उभे राहणे शक्य नाही” याचा नेमका. अर्थ लोकाना समजलेला नाही. दक्षिणेकडील व उत्तरेकडील राज्यांच्या संघर्षाच्या संदर्भात खचितच त्याने हे उद्गार काढलेले आहेत. तो म्हणाला, “दक्षिणेकडील राज्यातील तुम्ही व उत्तरेच्या राज्यातील आम्ही जरं विभागलेले असू तर परकीय आक्रमणाच्या वेळेस आपणास संघटितपणे उभे राहता येणार नाही.” 'ढासळलेले घर उभे राहू शकत नाही' हे उद्गार त्याने ज्यावेळेस काढले त्यावेळेस त्यालां अगोदर सांगितलेल्या अर्थानेच हे सांगावयाचे होते परंतु मला असे वाटते की त्याची संज्ञा किंवा त्याचे वाक्य यापेक्षा जास्त खोलवर अर्थगर्भित आहे आणि त्याचा अर्थ माझ्या समजुतीप्रमाणे असा आहे की, वर्गा-वर्गात खोलवर रूजलेली फाटाफूट हाच लोकशाहीच्या यशातील सर्वात मोठा अडथळा आहे. कारण लोकशाहीत नेमके काय घडते? लोकशाहीत दबलेल्यांना, पिळलेल्यांना व मानवी हक्कांपासून वंचित केलेल्यांना व जे ओझ्याचे बैल आहेत अशा सर्वांना विशेषाधिकारी लोकांच्या सारखाच मतदानाचा अधिकार असतो.. विशेषाधिकारी लोक ज्यांना विशेषाधिकार | नसतात अशा लोकांपेक्षा संख्येने कमी असतात. लोकशाहीत बहुसंख्यांकांचा कायदा हाच निर्णायक मानला जात असल्यामुळे अल्पसंख्यांक विशेषाधिकारी लोकांनी जर त्यांच्या खास हक्कांचा स्वेच्छेने व राजीखुषीने त्याग केला नाही तर विशेषाधिकारी लोक व सर्वसामान्य जनता यांच्यात निर्माण होणाऱ्या दरीने लोकशाहीचा नाश होईल व यातूनच काहीतरी फारच वेगळे निर्माण होईल.
जर तुम्ही जगातील वेगवेगळ्या भागातील लोकशाहीच्या इतिहासाची तपासणी केलीत तर तुम्हाला असे आढळून येईल की, सामाजिक विषमता हे लोकशाहीच्या नाशाला कारणीभूत होणाऱ्या कारणांपैकी एक आहे, याबद्दलं माझ्या मनांत कोणताही संदेह नाही | |
लोकशाहीच्या यशस्वी कामकाजासाठी आवश्यक असणारी दुसरी गोष्ट म्हणजे विरोधी पक्षाचे अस्तित्व. पक्ष पद्धतीला दूषण देणारे लोक मी केवळ यांच देशामध्ये पाहिलेले नाहीत तर इंग्लंड सारख्या देशात देखील मी असे पुष्कळसे
लोक पाहिले आहेत. इंग्लंडमधील पक्ष पद्धतीवर हॅन्सार्ड सोसायटीने प्रसिद्ध
केलेले एक छोटेसे पुस्तक मी येथे येण्यापूर्वी नुकताच वाचत होतो. या पुस्तकात पक्ष पद्धती चांगली आहे काय व ती सहन करता येण्यासाठी आहे काय या प्रश्नाला एक संपूर्ण प्रकरण वाहिलेले आहे. या प्रश्नावर बरीच मतभिन्नता आहे. मला सध्या असे वाटते की, पक्ष पद्धतीच्या विरूद्ध असणारे सर्व आणि याच संदर्भात जे विरोधी पक्षाच्या विरोधी आहेत अशा सर्वांना लोकशाही संकल्पनेचा पूर्णपणे अपसमज झालेला आहे. मग लोकशाही म्हणजे तरी