२२-१२-१९५२ लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्वावती शती - Page 370

३३० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

काय? मी तिची व्याख्या करीत नाही. मी लोकशाहीच्या कार्यासंबंधी प्रश्‍न

की, लोकशाही म्हणजे नकारशक्ती निर्माण करीत आहे. मला असे वाटते

आहे. आनुवंशिक अधिकार किंवा स्वयंसत्ताक अधिकार यांचा प्रतिशोधक म्हणजे लोकशाही. ज्यांची देशावर सत्ता आहे त्यांच्या अधिकारावर कोठेतरी केव्हातरी नकाराधिकार वापरणे म्हणजे लोकशाही. स्वयंसत्ताक राज्यव्यवस्थेत नकाराधिकार नसतो. राजाची एकवेळ नियुक्ती झाल्यानंतर अनुवंशिक किवा दैवी अधिकार म्हणूनच तो राज्य करतो. त्याला प्रत्येक पाच वर्षांनी जनतेसमोर जाऊन खालील प्रश्न विचारण्याची गरज पडत नाही. “मी गेल्या पाच वर्षात चांगले काम केले आहे, असे आपणास वाटते काय ? आणि असे जर वाटत असेल तर तुम्ही माझी पुन्हा नियुक्ती कराल काय ?“ राजाच्या सत्तेला आव्हान करणारा नकाराधिकार कोणाहीजवळ नसतो. परंतु लोकशाहीत जे सत्तेवर असतात त्यांना प्रत्येक पाच वर्षांनी जनतेसमोर जाऊन जनतेला असे विचारावे लागते की, जनतेच्या मताप्रमाणे त्यांच्या हिताची काळजी घेण्यासाठी, त्यांचे संरक्षण करण्यासाठी व त्यांच्या नियत जीवनात बदल घडविण्यासाठी सत्ता व अधिकार संपादण्यास ते लायक आहेत काय ? यालाच मी नकाराधिकार म्हणतो. सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षाच्या शेवटी जनतेपर्यंत जावे व मधल्याकाळात सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारे कोणी नसावे या पंचवार्षिक नकाराधिकाराने लोकशाहीचे समाधान होत नाही. लोकसत्तेच्या पाच वर्षाच्या दीर्घकालीन न्‌काराधिकाराशीच केवळ शासनाची बांधिलकी नसते तर तात्काळ नकाराधिकाराची लोकशाहीला फार आवश्यकता असते. जे शासनाला तेथेच आणि त्यानंतर तात्काळ आव्हान करू शकतील अशा लोकांची संसदेत फार आवश्यकता असते, मी जे काही आपणास सांगत आहे ते जर तुम्हाला नीट समजले तर लोकशाही म्हणजे राज्य करण्याचा कोणाचाही अखण्ड अधिकार नव्हे. राज्य करण्याचा हा अधिकार लोकांच्या मान्यतेला बांधलेला असतो व त्याला संसदेत आव्हान करता येते. यामुळे विरोधी पक्ष ही संकल्पना किती महत्त्वाची आहे याची आपणास जाणीव होईल. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या पक्षाला न मानणाऱ्या लोकांसाठी केलेल्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणे यालाच विरोधी पक्ष म्हणतात.

दुदैवाने आपल्या देशातील सर्व वृत्तपत्रे, कोणत्यातरी एका कारणासाठी किंवा अन्य काही कारणासाठी माझ्या मताप्रमाणे-जाहिरातीपासून उत्पन्न उपटण्याचे साधनं आहे. अशा वृत्तपत्रांनी शासनाला विरोधी पक्षापेक्षा जास्त प्रसिद्धी दिली आहे. कारण त्यांना विरोधी पक्षाकडून जाहिरातीचे उत्पन्न मिळत नाही. शासनाकडून त्यांना उत्पन्न मिळते आणि मग साहजिकच सत्ताधारी