२२-१२-१९५२ लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्वावती शती - Page 373

लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्वावर्ती शर्ती ३३३

होते. माझ्या अखत्यारीत पुष्कळच कामे होती. तो माझ्याकडे आला आणि

मला म्हणाला, “ डॉक्टर महोदय, लॉर्ड लिनलिथगो यांचे नाव एखाद्या संस्थेला ' किंवा सार्वजनिक बांधकामास देण्याच्या बाबतीत आपण काही करू शकाल , क्राय ? ते पुढे म्हणाले “ प्रत्येकाची नावे वेगवेगळ्या . संस्थांना किंवा । सार्वजनिक बांधकामांना दिली आहेत परंतु त्यांचेच नाव दिलेले नसावे ही बाब

, फ़ारच खटकणारी आहे. '' मी म्हणालो, “ मी विचार करीन. “ मी त्यावेळी

¦ जमुना नदीवर दिल्ली शहरास उन्हाळ्यात पाणी पुरवठा करण्यासाठी. बंधारा

बांधण्याच्या योजनेवर विचार करीत होतो. कारण उन्हाळ्यात दिल्ली एकदम

रखरखीत असते. ही बाब माझ्या प्रिअर नावाच्या युरोपियन सचिवास

: सांगितली. मी म्हणालो, ” महोदय हे पहा, गव्हर्नर-जनरलांच्या सचिवानी

` सांगितलेली सूचना आपणास ठाऊक आहेच. तेव्हा त्या बाबतीत आपण काही

करू शकू असे आपणास वाटते काय ?!' त्यांचे उत्तर काय असावे याची

आपणास कल्पना आहे ? त्यांनी असे उत्तर दिले की, “महोदय, ही गोष्ट

आपण करता कामा नये. या देशात अशा प्रकारच्या गोष्टी करणे कोणत्याही

परिस्थितीत अशक्यप्राय आहेत. ' एखाद्या अधिकाऱ्याने मंत्रीमहोदयांच्या

इच्छेविरूद्ध काही तरी बोलावे ही बाब माझ्या मताप्रमाणे निखालस अशक्य

आहे. परंतु त्याकाळी अशा गोष्टी शक्य होत्या. कारण ब्रिटिश लोकांप्रमाणे

आपण सुद्धा शासनाने प्रत्यक्ष कारभारात ढवळाढवळ करू नये अशाप्रकारचा

-सूज्ञ निर्णय घेतला होता. कारण शासनाचे मुख्य कार्य प्रशासनात ढवळाढवळ

'करणे किंवा भेदभाव करणे हे नसून धोरण निश्चित करण्याचे असते. ही बाब

अत्यंत मूलभूत आहे. आणि मला भीती वाटते कारण त्या न्यायापासून आपण

दुरावलो आहे. आपणाकडे असलेल्या त्या गोष्टीचा आपण संपूर्णपणे त्याग करू

किंवा ती नष्ट करून टाक.

माझ्या अभिप्रायाप्रमाणे यशस्वी लोकशाहीच्या कामकाजाची चौथी पूर्वावर्ती

शर्त म्हणजे सांविधानिक नैतिकता. आपल्या संविधानाबद्दल पुष्कळसे लोक

अतिउत्साही दिसतात. खरोखरच या गोष्टीची मला भीती वाटते. परंतु मी

. तसा नाही. ज्यांना भारतीय संविधान नष्ट करून त्याचा नवीन मसुदा करावासा

वाटतो अशा लोकांमध्ये सामील होण्यास माझी खरोखरच तयारी आहे. परंतु

“आपण हे विसरतो की आपले संविधान म्हणजे दुसरेतिसरे काही नसून वैध

"तरतुदींचा समावेश असलेला तो केवळ सांगाडा आहे. या सांगाड्याचे मांस,

आपण ज्याला सांविधानिक नैतिकता म्हणतो त्यामध्ये आढळते. यालाच

. इंग्लंडमध्ये संविधानाचे संकेत असे म्हणतात. आणि लोकांनी या खेळाच्या