२२-१२-१९५२ लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्वावती शती - Page 374

३३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

क्षणाला आठवणारी एक नियमांचे पालन केलेच पाहिजे. या संदर्भात या मला

असेल की दोन उदाहरणे मी आपणास सांगणार आहे. आपणास हे आठवतच ज्यावेळी अमेरिकेतील १३ वसाहतींनी बंड पुकारले त्यावेळी वॉशिंग्टन त्यांचा नेता होता. त्यावेळच्या अमेरिकन जीवनात केवळ नेता म्हणून वॉशिंग्टनचा उल्लेख करणे म्हणजे त्याच्या दर्जाचे खरोखरच अवमूल्यन करण्यासारखे होय. कारण अमेरिकन लोकांसाठी वॉशिंग्टन हा प्रत्यक्ष परमेश्वरच होता. तुम्ही जर त्याचा जीवन-इतिहास वाचला तर तुम्हाला असे आढळून येईल की तेथील

संविधान तयार झाल्यानंतर त्याला अमेरिकेचा पहिला राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले. त्याची मुदत संपल्यानंतर काय घडले? दुसऱ्यावेळी निवडणूक लढविण्यास त्याने नकार दिला. माझ्या मनामध्ये याबद्दल तिळमात्र

शंका नाही की वॉशिंग्टन जर लागोपाठ दहावेळा राष्ट्रपती पदासाठी उभा राहिला. असता तर तो प्रतिस्पर्ध्याशिवाय-बिनविरोध निवडला गेला असता. परंतु

दुसऱ्या वेळी तो खाली उतरला. ज्यावेळेस त्याला “ असे का " म्हणून विचारण्यात आले त्यावेळी त्याने असे सांगितले की, ' माझ्या मित्रांनो, ज्या हेतूने आपण आपले संविधान तयार केले त्याचा तुम्हाला विसर पडलेला दिसतो. आपणाला आनुवंशिक राज्यसत्ता नको आहे. तसेच आपणाला आनुवंशिक राजा किंवा हुकूमशहा नको आहे. यासाठी आपण हे संविधान तयार

केले आहे. इंग्लिश राजाच्या राज्यनिष्ठेचा त्याग व अव्हेर करून जर तुम्ही या देशात आला असाल आणि वर्षानुवर्ष व सातत्याने तुम्ही माझी पूजा करू लागलात तर तुमच्या तत्त्वप्रणालीचे काय होणार? इंग्लिश राजाच्या ठिकाणी जर तुम्ही मला बसवले तर इंग्लिश राजाच्या अधिकाराविरूद्ध तुम्ही न्याय्य बंड पुकारले असे तुम्हाला म्हणता येईल काय? जरी माझ्यावरील तुमची निष्ठा ब श्रद्धा मी दुसऱ्यांदा उभे राहावे याचा पुरस्कार करण्यासाठी तुम्हाला भाग पाडत असेल, तरी सुद्धा माझ्या सारख्याने, म्हणजे ज्याने आनुवंशिक अधिकार आपणाकडे नसावेत या तत्त्वाची प्रतिज्ञा केली, त्याने तुमच्या भावनांना बळी पडणे निश्‍चितच चांगले नाही. शेवटी फक्त दुसऱ्यांदाच त्याला निवडणुकीस उभे करण्यामध्ये येथील लोकांना यश मिळाले आणि तो उभा देखील राहिला परंतु त्याला तिसऱ्यांदा उभे करण्यासाठी ज्यावेळेस लोक त्याच्याकडे गेले त्यावेळेस मात्र त्याने लोकांना झिडकारले. मी आपणास दुसरे उदाहरण देतो. ज्याची वैवाहिक कथा नुकतीच ' टाइम्स ऑफ इंडियात ' प्रसिद्ध झाली आहे तो ८ वा विडसोर एडवर्ड तुम्हाला ठाऊकच आहे. मी राऊंड टेबल परिषदेसाठी तेथे गेलो असताना राजाला त्याच्या इच्छेप्रमाणे हव्या असलेल्या स्त्रीबरोबर लग्न करण्यास परवानगी आहे काय, यावर मोठा वादविवाद माजला होता. विशेषतः