लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्वावर्ती शर्ती ३३५
तो (राजा) त्यावेळेस तिच्या बरोबर प्रतिलोम विवाह करण्यास तयार होता. कारण तिला राणी होता येऊ नये किंवा ब्रिटिश लोकांनी त्याचा तो' वैयक्तिक अधिकारसुद्धा नाकारून पदत्यागास भाग पाडावे. मा. बाल्डविन, अर्थातच, राजाच्या या लग्नाविरूद्ध होते. त्याने राजाला परवानगी दिली नाही आणि तो म्हणाला, “ तुम्ही जर माझे ऐकले नाही तर तुम्हाला पदत्याग करावा लागेल. “ आपले मित्र मा. चर्चिल ८ व्या एडवर्डचे मित्र होते व ते त्याला या बाबतीत उत्तेजन देत होते. या प्रश्नाचे भांडवल करून मा. बाल्डविन यांचा पराभव करता येईल किंवा काय यावर त्यावेळी लेबर पार्टीचे लोक विचार करीत होते. कारण कॉझरव्हेदीव्ह पक्षातील पुष्कळसे लोक त्यांच्या निष्ठेतून राजाला पाठिंबा देऊ इच्छित होते आणि मला असे आठवते की दिवंगत प्रा. लास्की. लेबर पार्टीने असा काही पवित्रा घ्यावा याविरुद्ध ' हेरॉल्ड ' मध्ये लेखमाला लिहित होते. ते म्हणत होते, “ आपल्या संकेताप्रमाणे राजाने पंतप्रधानांचा सल्ला स्वीकारलाच पाहिजे, ही बाब आपण नेहमी मान्य केली आहे आणि जर राजाने पंतप्रधानांचा सल्ला मानला नाही तर पंतप्रधानांनी त्याला काढून टाकले पाहिजे. हा आपला संकेत असल्यामुळे राजाचा अधिकार वाढेल अशा या प्रश्नावर बाल्डविनचा पराभव करणे ही गोष्ट आपल्या दृष्टीने चूकीची आहे. “ लेबर पार्टीने त्यांचा हा सल्ला मानला आणि त्याप्रकारचे त्यांनी काही केले नाही. ते म्हणाले, ' त्यांनी खेळाचे नियम पाळले पाहिजेत. '' तुम्ही जर इंग्लंडचा इतिहास वाचलात तर तुम्हाला अशाप्रकारची अनेक उदाहरणे सापडतील की सत्तेवर असणाऱ्या किंवा विरोधात असणाऱ्या विरोधकांना तात्पुरती सत्ता प्राप्त होईल अशा मुद्यावर पकडून इजा करण्याचे अनेक मोह पक्ष प्रमुखांच्या समोर होते. परंतु अशा मोहास बळी पडण्यास त्यांनी नकार दिला. कारण अशा गोष्टीमुळे त्यांच्या संविधानास व लोकशाहीस नुकसान पोहचेल याची त्यांना जाणीव होती.
माझ्या मताप्रमाणे लोकशाहीच्या कामकाजासाठी फार महत्त्वाची बाब म्हणजे लोकशाहीच्या नावावर बहुमतवाल्यांनी अल्पमतवाल्यांवर जुलूम करता कामा नये. बहुमतवाले जरी सत्तेवर असले तरी अल्पमतवाल्यांना स्वतःबद्दल
सुरक्षितता वाटली पाहिजे. अल्पमतवाल्यांची मुस्कटदाबी केली जाते किवा
त्यांना डावपेचाने मार दिला जातोय अशी अल्पमतवाल्यांची भावना होता कामा
नये. या गोष्टीचा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये फारच मान राखला जातो. सन
१९३१ साली ज्यावेळेस रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी लेबर पार्टीचा राजीनामा दिला
व राष्ट्रीय सरकार स्थापन केले त्यावेळच्या इंग्लंडमधील सार्वत्रिक निवडणुकांचे
निकाल आपणापैकी पुष्कळशा लोकांना स्मरत असतील, ज्यावेळेस निवडणुका
होणार होत्या त्यावेळेस. लेबर पार्टीचे १५० च्या आसपास सदस्य_ होते.