लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्वावर्ती शर्ती ३३९
खरोखरच इतर ठिकाणी काय घडले हे पाहाण्यासाठी ह्या उदाहरणातून आपणास काही प्रमाणात धैर्य प्राप्त होईल. तसेच आपणापैकी काही लोकांना हे स्मरण असेल की, पहिल्या महायुद्धाचा परिणाम म्हणून आणि ऑस्ट्रिया-हंगेरिया साम्राज्याचे विभाजन म्हणून विल्सनने स्वयंनिर्णयाच्या आधारावर ऑस्ट्रियापासून स्वतंत्र असे वेगवेगळे छोटे देश निर्माण केले. त्याची सुरवात लोकशाही संविधानाने व लोकशाही शासनाने झाली. आणि त्यांच्या संविधानात मूलभूत अधिकारांचा समावेश देखील होता. हे मूलभूत अधिकार व्हरसाइल्सच्या शांतता तहाने त्यांच्यावर बंधनकारक केले होते. माझ्या मित्रांनो, त्या लोकशाहीचे काय झाले हे आपणास ठाऊक आहे काय ? लोकशाहीचा अंश तरी त्या ठिकाणी पाहावयास मिळतो काय ? त्या सर्व संपलेल्या आहेत. त्या सर्व नष्ट झालेल्या आहेत. काही दुसरी विद्यमान उदाहरणे विचारात घ्या. सिरियामध्ये लोकशाही शासन होते. फारच थोड्या वर्षानंतर तेथे लष्कराची क्रांती झाली. सिरियाचा प्रमुख कमांडर येथील राजा झाला व लोकशाही लोप पावली. दुसरे उदाहरण घ्या. इजिप्तमध्ये काय घडले ? तेथे सुद्धा सन १९२२ पासून सतत ३० वर्ष लोकशाही शासन व्यवस्था होती. परंतु एकाच रात्रीत फरूकला राज्यसत्ता सोडावी लागली व नजीब इजिप्तचा हुकूमशहा झाला. त्याने लगेच तेथील संविधान नष्ट केले.
ही सर्व उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत आणि म्हणून मला असे वाटते की, आपल्या भवितव्यासंबंधी आपण फारच सावध आणि फारच समजुतदार ` राहिले पाहिजे. आपली लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या मार्गातील काही दगडधोंडे व शिला दूर करण्याच्या कामी आपण काही ठाम कार्यक्रम घेणार आहोत किंवा नाही याचा आपणास गंभीरपणे विचार करावा लागेल. मी आपणासमोर मांडलेल्या काही विचारांमुळे आपणामध्ये जर काही जागृती निर्माण झाली असेल व या समस्यांबाबत आपण गाफील राहून चालणार नाही असे आपणास वाटत असेल तर माझे कर्तव्य मी पार पाडले आहे असे मला
वाढते! *
“ भाषणानंतर काही जणांनी प्रश्न विचारले. बाबासाहेब आंबेडकरांनी
त्यांना उत्तरे दिली.” २
१ यशस्वी संसदीय लोकशाहीच्या प्राथमिक शर्ती : अनुवादक सचित तासगावकर.
२ जनता : २७ डिसेंबर १९५२.