३०१
स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी मनोदौर्बल्य
टाकून, कंबर कसून पुढे आले पाहिजे
तारीख २५ डिसेंबर १९५२ रोजी कोल्हापूर येथे कोल्हापूरातील स्त्रियांच्या निरनिराळ्या नऊ संस्थांतफे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तेथील राजाराम चित्रपटगृहात मोठ्या थाटाने मानपत्र अर्पण करण्यात आले व त्यांनी स्त्रियांच्या विनंतीवरून आपल्या हिंदू कोड बिलात स्त्रियांना कोणकोणते हक्क दिले होते व काय तरतुदी केल्या होत्या याविषयी थोडक्यात पण सुबोध रीतीने विवेचन केले. या समारंभास असंख्य स्त्रिया व कित्येक पुरूषही हजर होते.
सुरूवातीस सुरेल असे महाराष्ट्र गीत झाल्यानंतर सौ. विमलाबाई बागल यांनी प्रास्ताविक भाषण केले त्यावेळी त्यांनी डॉ. आंबेडकरांचे हिंदू कोड बिल बारगळल्याबद्दल खेद व्यक्त करून सांगितले की, ते बिल होईपर्यंत आपण स्त्रियांनी डॉ. आंबेडकरांच्या पाठिशी राहिले पाहिजे.
त्यानंतर त्यांनी मानपत्र वाचून दाखवून ते अर्पण केले, तसेच करवीर भगिनी मंडळ, शुक्रवार पेठ भगिनी मंडळ, महिला सेवा मंडळ, वनिता समाज, नामदेव महिला मंडळ, शारदा भगिनी मंडळ, स्त्री मंडळ, शिवाजी पेठ भगिनी मंडळ, मराठा महिला मंडळ या संस्थांतर्फे डॉ. आंबेडकरांना पुष्पहार घालण्यात आले. मेजर दादासाहेब निंबाळकर यांनीही डॉ. बाबासाहेब व सौ. माईसाहेब आंबेडकर यांना हार घातले.
त्यानंतर उत्तरदाखल भाषण करताना डॉ. आंबेडकर म्हणाले,
आजच्या जगात संपत्तीच स्वातंत्र्याचा आधारस्तंभ आहे. जोवर स्त्रियांना संपत्तीचा वारसा मिळत नाही, तोवर त्यांची गुलामगिरी संपणार नाही. त्यादृष्टीने हिंदू कोड बिलात मी तरतूदही केली होती. पण ते बिल मंजूर होऊ शकले नाही. यापुढे आता येणारे बिल कोणत्या स्वरूपात येते व त्यात स्त्रियांच्या स्वातंत्र्याची, हक्कांची काय तरतूद आहे याकडे महिला वर्गाने फार बारकाईने पाहिले पाहिजे. इतकेच नव्हे तर आपल्या हक्कांसाठी झगडण्यास त्यांनी आपले मनोदौर्बल्य टाकून कंबर कसून पुढे आले पाहिजे, तरच त्यांची सुधारणा व प्रगती होईल. एखाद्या स्त्रीने दुधात विरजण घालून ठेवावे आणि तिला ते विरजण
जनता : ३ जानेवारी १९५३.