स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी . . . . पुढे आले पाहिजे ३४१
शेवटी नासले असल्याचे दिसावे, तशी स्थिती माझ्या हिंदू कोड बिलाची झाली आहे. मी चार वर्षे खर्डेघाशी करून ज्या स्वरूपात ते बिल तयार केले होते त्याच स्वरूपात आता नवीन बिल येईल की नाही, हे सांगता येणार नाही. पण त्यात आमूलाग्र बदल होईल असे मात्र खात्रीने वाटत नाही. माझ्या बिलाच्या टीकाकारांनी ते हिंदू धर्मशास्त्रास सोडून आहे अशी टीका केली. पण तसे म्हणणाऱ्यांना माझे आव्हान आहे, की मनुस्मृतीचा आधार नाही असे त्यात कोणते कलम आहे, ते त्यांनी दाखवून द्यावे.
तसेच स्त्रियांना घटस्फोटाची तरतूदही त्यात करून दिली होती. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या त्रैवर्णिक समाजाखेरीज बाकीच्या समाजात घटस्फोटाची म्हणजे काडीमोडाची चाल चालूच आहे. ही चाल असणारे ९० टक्के शूद्र या भारतात आहेत. पण कायद्यामध्ये घटस्फोटाची तरतूद करू लागताच उपरोक्त त्रैवर्णियांनी माझ्यावर टीकेचे काहूर उठविले.
त्या बिलात स्त्रियांच्या हिताच्या दृष्टीने सर्व बाबींची तरतूद आहे, त्यातील काही महत्त्वाच्या बाबी आहेत, लग्नात किंवा दत्तक घेण्याच्या बाबतीत जातीभेदाचे बंधन नसावे हे मुख्य तत्त्व मांडले होते. त्याचा अर्थ असा नव्हे की, जबरदस्तीने आंतरजातीय विवाह व दत्तक व्हावेत. एकमेकांवरील प्रेमामुळे जर कोणाला आंतरजातीय विवाह करावयाचा झाला किंवा परजातीतील मुलगा दत्तक घ्यावयाची इच्छा झाली तर तसे करण्यास स्मृतीमुळे ती बंदी होती, ती या बिलाने काढून टाकली होती.
' नवरा हाच. देव ' मानणाऱ्या आर्य स्त्रिया आहेत. नवऱ्याने कसेही वागविले, तो कसाही व. कितीही वाईट असला, त्याच्याशी जीवन कंठणे कितीही कष्टमय झाले तरी आर्य स्त्री आपल्या जुन्या शास्त्रानुसार त्याला सोडून जाऊ शकत नाही. नवऱ्याला मात्र मुभा आहेत. म्हणून ज्या स्त्रीला आपल्या नवऱ्याबरोबर संसार करणे [बरे ] [वाटणार ] [नाही, ] [तिला ] [घटस्फोट ] घेण्याची या बिलाने मुभा देण्यात आली [होती. ]
त्याचप्रमाणे स्त्री-धनाच्या तरतुदी केल्या आहेत. नवरा मेल्यानंतर त्याच्या ईस्टेटीची मालकी त्या स्त्रीला मिळण्यास आजवर बंधने होती, ती मी काढून टाकली होती. नवऱ्याच्या मालमत्तेची पूर्ण मालकी त्याच्या पत्नीलाच मिळाली पाहिजे. तसेच एखादी स्त्री वारल्यास तिच्या मुलीलाच मिळाली पाहिजे हा माझा हटवाद आहे. बाप मेल्यावर भाऊ-भाऊ बापाच्या संपत्तीची वाटणी करून घेतात. त्या भावाबरोबर त्यांच्या बहिणीलाही का वाटणी मिळू नये ?