संघटनेची ताकद .. .. ... . शिस्तपालनावर अवलंबून ३५१
शिस्त आणि प्रामाणिकपणा ह्या दोन गोष्टींची कार्यकर्त्यांमध्ये विशेष जरूरी आहे. फेडरेशनच्या धोरणाविरुद्ध उघडपणे वा गुप्तपणे काम करणाऱ्यास फेडरेशनमध्ये स्थान नाही. तसेच, संघटनेची ताकद ही केवळ सभासदांच्या संख्येवर अवलंबून नसून सभासदांच्या प्रामाणिकपणावर, संघटनेशी एकनिष्ठतेवर आणि शिस्तपालनावर अवलंबून असते: फेडरेशनचे धोरण ज्यांना पसंत नसेल त्यांनी खुशाल फेडरेशनमधून जावे; ज्यांना फेडरेशनमध्ये राहावयाचे असेल त्यांनी मात्र पक्षाची शिस्त मोडता कामा नये आणि इतर राजकीय पक्षांशी वा गटांशी फेडरेशनच्या धोरणाविरुद्ध जाऊन एकजुटिची अगर कराराची बोलणी करता कामा नयेत; तसेच त्यांनी आपल्या प्रत्येक व्यवहारात फेडरेशनशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिले पाहिजे.