२७-४-१९५३ मी माझ्या आयुष्याचे शेवटचे दिवस बुद्ध धर्माच्या प्रचारातच व्यतीत करण्याचे ठरविले आहे - Page 392

३०७ |
मी माझे आयुष्याचे शेवटचे दिवस बुद्ध धर्माच्या
प्रचारातच व्यतीत करण्याचे ठरविले आहे

दिनांक २७ मे १९५३ रोजी बुद्ध जयंती निमित्त सकाळी ८ वाजता वरळी, आंबेडकर मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामुदायिक प्रार्थना कशी करावी याचे मार्गदर्शन करणार आहेत आणि सायंकाळी ५ वाजता नरेपार्क, परेल (जी. आय. पी. रेल्वे वर्क शॉप समोरील मैदान) येथे त्यांचे. जाहीर व्याख्यान होईल असे दि. २३ मे १९५३ च्या जनतेत श्री. आर. डी. भंडारे, सेक्रेटरी, बौद्ध धर्म प्रचार समिती यांनी जाहीर केले होते.

त्यानुसार मुंबई नरेपार्क येथे दिनांक २७ मे १९५३ रोजी सायंकाळी या कार्यक्रमाला प्रचंड जनसमुदाय होता. प्रथम श्री. आर. डी भंडारे यांनी भ, बुद्धाच्या फोटोला हार अर्पण केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

भगिनींनो आणि बंधुजनहो,

आपण आज सर्वजण बुद्ध जयंती निमित्ताने एकत्र आलो आहोत. आज या ठिकाणी जी बुद्ध जयंती साजरी होत आहे तशी ती अनेक ठिकाणी साजरी होत असली तरी येथील जयंतीला विशेष महत्त्व आहे. बुद्ध जयंतीचा दिवस हा सुट्टीचा दिवस मानला जावा म्हणून मी सन १९४२ सालापासून सरकारकडे मागणी करीत होतो. मध्यंतरीच्या काळात मंत्रीमंडळात असतानाही मी बुद्ध जयंतीची सुट्टी मिळावी म्हणून प्रयत्न करीत होतो. परंतु माझे मनोरथ पूर्ण होऊ शकले नाही. त्यावेळचे गृहमंत्री श्री. मॅक्सवेल यांचीही बुद्ध जयंतीची सुट्टी असावी अशी मनीषा होती. परंतु लढाईच्या काळामुळे ती सफल होऊ शकली नाही. बुद्ध जन्मदिनाची सुट्टी जर जाहीर केली तर आपणास युद्धासाठी मुसलमानांपासून मिळत असलेली मदत मिळणार नाही, या विवंचनेत ते होते. त्यानंतर मला पुन्हा काँग्रेस मंत्रीमंडळात घेतले गेले. मंत्रीमंडळात गेल्यानंतर ही माझी जी मागणी होती ती श्री. पंडित जवाहरलाल नेहरुंनी तरी मान्य करावी म्हणून मी त्यांच्या खूप पाठिशी लागलो. माझ्या या मागणीला महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनीही साहाय्य

जनता : ३० मे १९५३.