३-६-१९५३ एशीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य - Page 398

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३५८

“ जरी केले तरी वर्तमानपत्रात एक पाढा नेहमी म्हटला जातो की, काही

किंवा धर्मकारणाने म्हणा अस्पृश्यता जाऊ शकत नाही, राजकारणाने म्हणा

अस्पृश्यता जाणार नाही. “ अशा लोकांना माझ्याबरोबर चर्चा करावयाची असल्यास माझी तयारी आहे. हे लोक उपजत आंधळे आहेत, असे मला वाटते. त्यांनी इतिहास वाचला नाही. जगात आतापर्यंत किती परिवर्तने झाली याची त्यांना माहिती नाही. म्हणून ते अशी मूर्खपणाची टीका करतात.

आज या ठिकाणी बसलेला प्रचंड स्त्री-पुरुष समुदाय हाच मागची परिस्थिती काय होती व आजची परिस्थिती काय आहे, हे समजावून देईल. लोक काय म्हणतात इकडे तुम्ही लक्ष देऊ नका. ते जे काही लिहितात ते तुमचा गैरसमज करण्याकरिता लिहितात. सर्व वर्तमानपत्रे माझ्यावर टीका करतात, मात्र, त्याची मला पर्वा नाही. त्यांच्या टीकेमुळे माझे वजन घटेल असे समजण्याचे कारण नाही. मी दरवर्षाला पाहतो तो माझे वजन वाढतच आहे.

नाशिक सत्याग्रहाची गोष्ट घेऊ. आता खऱ्या गोष्टी तुम्हाला सांगावयास हरकत नाही. श्री. भाऊराव गायकवाड इत्यादि पाच-सहा प्रमुख लोकच माझ्या मदतीस होते. त्यावेळी रात्री १२ वाजता सभा घेतली. सत्याग्रहासाठी किती लोक नावे देतात ते आम्ही पाहिले. त्यावेळी आम्ही काय प्रकार पाहिला ? सकाळपर्यंत आम्हाला एकही गडी सत्याग्रहासाठी मिळाला नाही. सत्याग्रह केला तर काय होईल याची भीती लोकांच्या मनात होती. सकाळी आम्ही एक मिरवणूक काढण्याचे ठरविले. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा या मिरवणुकीतल्या लोकांवर इतर लोकांनी दगड धोंडे

टाकले. त्यामुळे प्रथम आम्हाला पंधरा-वीस सत्याग्रही मिळाले. नंतर

लोकांच्या लक्षात आले की, सत्याग्रह करणे यात स्वाभिमान आहे. ही गोष्ट समजल्यावर आम्हाला सत्याग्रही मिळण्यास अडचण पडली नाही. नंतर आम्ही एक-दोन वर्ष नव्हे तर चार-पाच वर्षे सत्याग्रह चालवू शकलो. पूर्वीच्या गोष्टीचा

विचार केला तर आता पुष्कळच सुधारणा झाली आहे, असे मला म्हणावयाचे आहे.

आपण शिक्षणाचीच गोष्ट घेऊ. माझ्यावेळी ' मला शाळेत घ्यावे की नाही ' याचा खल करण्यासाठी ३ दिवस मास्तरांची सभा भरली होती. मला त्यावेळी सरकारकडून ३ रुपये स्कॉलरशिप मिळत होती. या मुलाला शाळेत घेतले नाही तर सरकारचा कोप होण्याचा संभव आहे, या सबबीवर मला सरकारी

हायस्कूलमध्ये घ्यावयाचे ठरले. त्यावेळी मी निव्वळ गावठी पोर होतो. त्यात

ब्राह्मणी जोडा घालावयाचा. पहिल्या दिवशी मी हायस्कूलमध्ये गेलो तर

माझ्या ४० वर्षे वयाच्या भावाचे शर्ट घालून गेलो. पायापर्यंत घातलेले शर्ट असा त्यावेळी माझा अवतार होता. त्यावेळी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये असंख्य मुले