आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३६२
काय ? माझ्या तरी निदर्शनास गोष्ट या ३१ लोकांपैकी एखाद्याने केलेली आहे
असेंब्लीच्या कामकाजाचा यापैकी काहीच आलेले नाही. मग कदाचित
सांगण्याचा वर्तमानपत्रात वृत्तांत येत नसतो म्हणून मला माहीत होत नसेल. उद्देश एवढाच की, असेंब्लीमध्ये निवडून गेल्यावर निदान या गोष्टी तरी आपल्या सभासदांनी करावयास पाहिजेत. राजकारण हाच जर कार्यकर्त्यांच्या समोर मुख्य उद्देश असेल तर त्यांनी तो तरी कार्यक्रम चांगल्याप्रकारे पार पाडला आहे काय ? मला हे सुद्धा दिसत नाही.
या ३१ लोकांनी एका उद्देशाने, एका निश्चयाने, एका जमावाने जर वागायचे ठरविले तर मला खात्री आहे की काँग्रेस सरकारच नव्हे तर काँग्रेस आणि इतर
पक्षही आपल्या लोकांना घाबरल्याशिवाय राहाणार नाहीत.
या ज्या राखीव जागा मिळविल्या आहेत त्या अस्पृश्य समाजाच्या हितासाठी मिळविल्या आहेत. जी माणसे आमच्यासाठी पाठविली, ज्यांच्यावर आमचा विश्वास आहे अशा निवडून आलेल्या माणसांनी अस्पृश्य समाजाचे हितासाठी झगडावयास नको काय? माझा जो गांधींशी विरोध होता किंवा देशातील लोकांचा आणि काँग्रेसचा जो मी विरोध सहन केलेला आहे, त्याचे कारण एकच. अस्पृश्य समाजाचे हितासाठी ते लोक काहीच करू शकत नाहीत, हेच ते कारण आहे. सरकारने किंवा या देशातील लोकांनी आमचे म्हणणे ऐकले, आमच्या मागण्या मान्य केल्या, तर मग विरोधाचे आणि लढ्याचे काहीच कारण राहाणार नाही. पण हे असे होत नाही, म्हणूनच आपणास लढावे लागते.
राजकारण कोणास करावयाचे असेल, तर राजकारणाचा चांगला अभ्यास केला
पाहिजे. अभ्यासाशिवाय जगामध्ये कोणालाच काहीच साधता येणार नाही. आपल्या समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याने राजकीय, धार्मिक आणि
आर्थिक या सर्व प्रश्नांचा चांगला बारकाईने अभ्यास करावयास पाहिजे. ज्यांना
पुढारी व्हावयाचे असेल त्यांनी पुढाऱ्याची कर्तव्यकमे, पुढाऱ्याची जबाबदारी काय
आहे याची जाणीव ठेवावयास पाहिजे. कारण आपल्या समाजातील पुढाऱ्यांवर
अत्यंत मोठी जबाबदारी आहे. इतर समाजाच्या पुढाऱ्यांसारखी आपल्या
समाजातील पुढाऱ्यांची स्थिती नाही. इतर पुढाऱ्यांचे काय ? सभेत जाणे, लांबलचक भाषण करणे, टाळ्या मिळविणे आणि शेवटी हार गळ्यात घालून घरी
येणे, एवढेच काम इतर पुढाऱ्यांकडे असते. आपल्या समाजातील पुढाऱ्यांना हे
करून भागणार नाही. चांगला अभ्यास करणे, विचार करणे समाजाच्या उन्नतीसाठी स्वतः रात्रंदिवस सतत अंगमेहनत करणे, हे आपल्या तरी पुढाऱ्यांना करावे लागेल. तरच तो लोकांचे थोडेफार भले करू शकेल, तोच खरा पुढारी
ठरू शकेल.