३७० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
विनियोग करणे अत्यंत आवश्यक आहे. दारिद्र्य, अज्ञान, रोगराई इतकी आहे की सध्याच्या काळात ती नष्ट करण्यासाठी असा पैसा खर्च न करता तो धनिकांसाठी खर्च करणे म्हणजे दुष्टपणा ठरेल. त्या पैशाचा विनियोग रूग्णालये, शिक्षण, बेकारासाठी छोटे छोटे धंदे, गरीब व अनाथ महिलांसाठी काही तरी धं॑देशिक्षण देणे अशा कार्यावर त्यांनी करावा. आपण जर जमा केलेल्या पैशाचा विनियोग अशारितीने केला तर त्यामुळे आपल्या कार्याची वाहवा होईल. एवढेच नव्हे तर साईबाबाची कीर्ती दाही दिशांना दुमदुमत राहील.