१४-१-१९४६ जे लोक कोट्यवधींना अस्पृश्य नि गुन्हेगार मानतात त्यांना स्वातंत्र्य मागण्याचा हक्क कसा पोहोचतो ? - Page 41

जे लोक कोट्यवधींना अस्पृश्य . . . . . हक्क कसा पोहोचतो ? ३

कृतीची जरुरी असते. कुठेही मी गेलो तरी उद्देग वाटण्यासारख्या या गोष्टी आहेत. अस्पृश्यता निवारण्याचे खरे कार्य मीच करीत आहे.

खरे म्हणजे हे कार्य स्पृश्य समाजातील पुढाऱ्यांचे आहे. इंग्रज लोकांजवळ स्वराज्य मागणाऱ्या लोकांनी आपल्या देशातील अस्पृश्यता निवारण्याचे कार्य प्रथम हाती घेतले पाहिजे. या स्वराज्य मागणाऱ्या लोकांबद्दल इंग्रज लोक अंतर्यामी काय बोलतात याची मला जाणीव आहे. अस्पृश्यता नष्ट होईल तितक्या लवकर स्वराज्य हाती येईल. त्याशिवाय स्वराज्य मिळणार नाही. हे निश्‍चित.