२०-४-१९५४ धमोप्रमाणे राजकारणातही निष्ठा बाणली नाही तर तो "लफंग्यांचा बाजार" ठरेल - Page 414

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३७४

उमेदवार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भंडारा संसद पोटनिवडणुकीत

आपला डॉ. बाबासाहेबांना पाठिंबा उभे राहिल्यानंतर मध्यप्रदेशातील अनेक पक्षांनी

उमेदवारीला असल्याचे जाहीर केले. डॉ. बाबासाहेब येथे आल्यानंतर त्यांच्या पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना मुद्दाम निमंत्रित करण्यात आले. या मेळाव्यात म. प्र. जनसंघाचे दत्तोपंत ठेंगडी, प्र. स. पक्षाचे श्री. आवारी, हातमाग, विणकाम संघाचे श्री. रा. बा. कुंभारे, निर्वासितातर्फे श्री. हंसराजनी, कम्युनिस्ट पक्षाचे श्री. बर्धन, प्रा. शि. संघ आणि सं. महाराष्ट्र परिषद या संस्थेचे श्री. भोसले व शे. का. फे. चे श्री. राजभोज, दादासाहेब गायकवाड, मुं. वि. सभेचे व शे. का. फे. सदस्य श्री. बापू चंद्रसेन कांबळे, बॅ. खोबरागडे, नागपूर कार्पेरेशनचे डे. मेयर श्री. धरमदास मेश्राम आणि हरिदास आवळे इत्यादी प्रतिष्ठित कार्यकर्ते

उपस्थित होते.

दिनांक २० एप्रिल १९५४ रोजी आपल्या स्वागत समारंभात बोलताना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

राष्ट्र नाशाच्या मार्गाला लागले आहे असे मला वाटते. म्हणूनच मी निवडणुकीस उभा राहात आहे. काँग्रेसशी “ तडजोड “ करण्याची तयारी मी दर्शविली असती तर लोकसभेत टिकून राहाणे मला अशक्य झाले नसते. पण धर्माप्रमाणे राजकारणातही निष्ठा बाणली नाही तर तो " लफ॑ग्यांचा बाजार "'

ठरेल. विरोधी पक्षाच्या जागेवरून लोकांपुढे भिन्न दृष्टिकोन ठेवण्यासाठीच मी

ही निवडणूक लढवित आहे.

काँग्रेस सरकारला आपली कर्तबगारी सिद्ध करण्यासाठी भरपूर अवधी दिला

गेला असूनही आतापर्यंत कुठलाही प्रश्‍न ते सोडवू शकलेले नाहीत. यापुढे

नुसते भाविकतेने पाहून चालणार नाही तर चिकित्सक मनाने या सगळ्या

गोष्टींकडे पाहिले पाहिजे. प्रथम देश, मागाहून पंतप्रधान नि काँग्रेस अशा निर्लेप मनाने पाहिले पाहिजे. चालू सरकार बदलून घेणे हे लोकांचे आज महान कर्तव्य

ठरते.

आज भारताला जगात कुणी मित्र राहिलेला नाही. हिटलरच्या जर्मनीभोवती

जसा वेढा पडला होता तसे काहीसे येथे झाले आहे. पाकिस्तानला मिळावयाची

अमेरिकन लष्करी मदत ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे. तिचे विराट परिणाम होतील. पाकिस्तानला अशी मदत मिळत असता इतस्ततः विखुरलेली खंडित झालेली इंतर मुसलमान राष्ट्रेही एक होतील व त्यांचे '' इस्लामी संयुक्‍त राज्य "' स्थापन होईल, हे काय सांगायला हवे ? या इस्लामी संयुक्‍त राज्याचा आपल्या