२०-४-१९५४ धमोप्रमाणे राजकारणातही निष्ठा बाणली नाही तर तो "लफंग्यांचा बाजार" ठरेल - Page 415

धर्माप्रमाणे राजकारणातही . . . . तो '' लफंग्यांचा बाजार '' ठरेल ३७५

सबंध राष्ट्राला वेढा पडेल. मी तुम्हाला असेही निक्षून सांगतो की अफगाणिस्ताननेही अमेरिकन मदत स्वीकारली असून संकल्पित पाक-अफगाण फेडरेशनच्या बातम्यांचा जो इन्कार होत आहे ती केवळ ' धूळफेक ' आहे; दुसरे काही नाही. दुसऱ्या बाजूने आशिया काबीज करून त्याला कम्युनिझमच्या प्रभावळीत आणण्यासाठी रशिया व चीनही डाव टाकीत आहेत.

तेव्हा तुम्हाला प्रभावी व्हायचे असल्यास तुम्ही हातात बंदूका घेतल्या पाहिजेत. मऊ गुळगुळीत भाषणांनी काम व्हायचे नाही. तुम्ही कुठलीतरी एक खंबीर भूमिका घेतली पाहिजे. तुम्हाला पार्लमेंटरी सरकार पाहिजे काय ? ग्यानबाची मेख इथेच आहे. जर पार्लमेंटरी सरकार हवे असेल तर जिथे पार्लमेंटरी सरकार आहे व बाह्य आक्रमणाविरुद्ध त्याचे रक्षण करण्यासाठी. जे सिद्ध आहेत अशांना आपण सहकार्य केले पाहिजे. तसे नको असेल तर उद्या आपण रशिया व चीन यांच्याशी दोस्ती करु या.