आपला देश दोन राष्ट्रात . . . . दुसरे खालच्या लोकांचे ३७९
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सात वर्षाची मुदत मिळाली. त्या मुदतीत कर्तबगार पुरुष अस्मान खाली आणू शकेल. पण पं. नेहरू यांनी काय केले ? आम्ही ब्रिटिशांच्या राजवटीत स्वातंत्र्य का मागितले ? जे अनेक प्रश्न ब्रिटिश राजवटीत उत्पन्न झाले, त्यांची सोडवणूक आम्ही करू असे हे नेते त्यावेळी म्हणत. सध्याचा मुख्य प्रश्न विषमता हा आहे पण त्याविषयी कोणी बोलतच नाही. तसे पाहिले तर आपला देश दोन राष्ट्रात विभागला गेला आहे. एक राष्ट्र वरच्या लोकांचे आणि दुसरे खालच्या लोकांचे. सर्व मंत्री वरच्या वर्गाचेच, एखादा अपवाद सोडून. सामान्य माणसांना त्या स्वातंत्र्याचा यत्किंचितही फायदा मिळालेला नाही.
गेल्या वर्षी पं. नेहरू यांनी एका सभेचे उद्घाटन करताना सांगितले की, माझ्या दृष्टीने अस्पृश्यता हा सामाजिक प्रश्नच नाही. ते कामगार आहेत आणि इतर कामगारांबरोबर त्यांचेही प्रश्न सुटतील. गांधी लाजेकाजेस्तव का होईना, अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे व तो धुवून टाकावा असे म्हणत. तेवढेसुद्धा हा माणूस म्हणत नाही.
सर्वोदय म्हणजे मला ढोंग वाटते. एक माणूस कसा सर्वोदय करू शकेल हे कळत नाही. व्यवहारात "' मात्स्य न्याय “ आहे. सर्वांचेच हित पाहिले पाहिजे. या म्हणण्यावर तुमचा विश्वास बसतो काय ? सर्वोदयाच्या अनुषंगाने मला विश्वामित्राची आठवण येते. विश्वामित्राने ब्रह्मदेवाशी स्पर्धा करून प्रतिसृष्टी निर्माण केली. तिचे वर्णन करताना मुक्तेश्वराने सांगितले आहे की, या विश्वामित्राच्या सृष्टीत जन्मजात हाडवैरी असलेले मुंगुस आणि साप प्रेमाने क्रीडा करीत होते, उंदीर मांजरीचे दूध पीत होते व सिंह आणि हत्ती परस्पर प्रेमाने नांदत होते. वास्तविक हे असे घडणे शक्य नाही. पण कवी मुक््तेश्वराने पुढे सांगितले आहे की, हे सर्व कपटजाल होते. सर्वोदय मजुरांबरोबर श्रीमंतांचे हित पाहाणार असेल, त्यांना प्रेमाने एकत्र नांदवू इच्छित असेल तर ते कपटजाल आहे असेच म्हणावे लागेल.
लाचलुचपत का होते याचे कारण हे आहे की, पंडित नेहरू यांच्या अंगी ताकद नाही. स्वतः पंडित नेहरू प्रामाणिक आहेत. त्यांच्याविषयी मला काही म्हणावयाचे नाही. पण त्यांचा दोष एकच की त्यांनी एखाद्याला मित्र म्हटले की, ते त्याला कायमचा आश्रय देतात. मेनन यांचे जीप प्रकरण तर प्रसिद्धच आहे. मी मंत्रीमंडळात असताना पंडित नेहरू यांना सांगितले होते की, हे इतके जागोजाग वकील का नेमता? बेधडकपणे ८ कोटी रुपये दरसाल या वकिलातीवर खर्च करण्यात येतात. तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो की,