२१-४-१९५४ आपला देश दोन राष्ट्रांत विभागला आहे. एक वरच्या लोकांचे, दुसरे खालच्या लोकांचे - Page 420

३८० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अमेरिका व कॅनडा येथील सरकारांनी, “ तुमच्या वकिलांना परत बोलवा “ अशी . मागणी केली. तुर्कस्तान मधील वकिलाने अन्न खरेदीत गोंधळ घातला. परदेशात ज्या माणसांनी आपले आणि देशाचे नाव बद्दू केले त्यांना इकडे आल्यावर काय शिक्षा मिळते ? अशा एका माणसाला तो भारतात आल्यावर गुन्हेगार करण्यात आले आणि नंतर पुन्हा वकील म्हणून परदेशी पाठविण्यात आले. पंडित नेहरू हे गाजरपारखी आहेत. आपल्या आवडीची माणसे आणि देशाचे हित यात काहीच फरक नाही का ? पण पंडित नेहरू यांना हा फरक कळत नाही आणि अशा माणसाला पाठिंबा द्यायचा काय ?

पंडितजींचे पूर्वज ३०० वर्षापूर्वी भारतात आले. पण आजही त्यांना वाटते की, मी प्रथम काश्मिरी आहे आणि नंतर भारतीय आहे. , तेव्हा मला आश्‍चर्य वाटते की, जो माणूस स्वतःला अभिमानाने प्रथम हिंदी म्हणवून घेत नाही, त्याला भारताचा पंतप्रधान होण्याचा काय हक्क ?

काश्मीरसाठी माझ्या भारताचे रक्‍तशोषण किती करावे याचा विचार ते करीत नाहीत. काश्मीरच्या राजाला एकूण ९ लाख रुपये वार्षिक तनखा आहे. पण त्यापैकी काश्मीर सरकार फक्त ३ लाख रुपये देते आणि बाकीचे ६ लाख भारत सरकार या देशातील जनेतवर कर बसवून मिळालेल्या पैशातून देते. मी निवडून गेलो तर मी त्यांना हे विचारणार आहे की, गेल्या सात वर्षात काश्मीरमधील आपल्या सैन्यावर किती रुपये खर्च झाले आहेत ? त्यांनी हे मुद्दाम गुप्त ठेवले आहे. माझ्या मते हा खर्च २०० कोटींवर गेला असावा. पण इकडे भारताची प्रजा उपाशी मरत असताना एवढा खर्च कसा करावा असा विचार पं. नेहरू यांना कधी सुचत नाही.

पं. नेहरू हे दुसऱ्या कोणी सुचविलेली चांगली गोष्ट घेण्यास तयार नाहीत आणि स्वतः काही नवीन सुचवावयास त्यांची बुद्धी नाही.

हल्ली लोक जसे सिनेमा स्टारचे वेडे होतात, तसे पं. नेहरूंसाठी वेडे झाले आहेत. पण सिनेमा स्टारच्या मागे लागून वेडा होणारा तरुण आपल्या आवडीच्या नटीचा सिनेमा पाहून परत घरी आल्यावर बायकोवर प्रम करतो आणि सुखी होतो. पण पं. नेहरू यांच्याबाबतीत असे घडत नाही. ते सर्वजण पं. नेहरू यांनाच चिकटून बसतात.