आपला देश दोन राष्ट्रात . . . . दुसरे खालच्या लोकांचे ३८१
महाभारतात सांगितले आहे की, द्रोण आणि भीष्म पांडवांची बाजू खरी आहे
म्हणत. पण ऐन लढाईच्या वेळी मात्र ते कौरवांच्या बाजने
लोकांनी प्रश्न विचारला तेव्हा भीष्मानी सरळ सांगितले की, '' अर्थस्य
षो दास: ' आज कॉग्रेसला श्रीमंत मारवाडी लोक सढळ हाताने पैसा पुरवित
आहेत. याचा परिणाम काय होईल ते तुम्ही जाणताच '' अर्थस्य पुरुषो दास
हे सूत्र येथेही लागू पडतेच.
पार्लमेंटमधील किती काँग्रेस सभासद किती भाषणे करतात हे त्यांना
विचारा. बोरकर येथे असते तर मी त्यांना विचारले असते की, तुम्ही काय
आहात ? ते काय करू शकतात ? त्यांना कायद्याचे ज्ञान आहे
ष्का? भत्त्याचे ३० रुपये मिळवण्यासाठी ते जात आहेत. या पलिकडे हिकाय ? पार्लमेंटच्या कामाला पुनमचंदजी कितपत लायक आहेत हे
हमला माहीत नाही, लोकांचा आपल्यावर विशवास आहे असे काँग्रेसला वाटते. पण वाटेल त्या माणसाला आमच्या नावावर मते द्या असे त्या
विश्वासाचा दुरुपयोग करणे म्हणजे विश्वासघात नव्हे काय? काँग्रेसचे
हलोक इतके निर्लज्ज बनले आहेत, धिक्कार असो त्या काँग्रेसच्या
लोकांचा, " चोरापासून सावध राहा” अशा पाट्या आपण नेहमी
{ वाचतो. मी तुम्हाला सांगतो की, काँग्रेसपासून सावध राहा. कारण ती
माझा सर्व विशवास अस्पृश्य वर्गाच्या मतदारांवर आहे. तुम्ही कोणत्याही शै प्रकारच्या लाचलुचपतीला बळी पडता कामा नये. मत ही एक अमोल चीज
माना. आप '' गिरी हुआ “ जात का ? लक्षात घ्या की आपल्याला काही £ अधिकार नाही, ब्राह्मणांचे धार्मिक सामर्थ्यही आपल्याला नाही, सामाजिक
“सामर्थ्यही नाही म्हणून आपल्यासाठी मत ही राजकीय क्षेत्रातील एक
अमोलिक चीज आहे. ती विकता कामा नये. आपण अल्पसंख्यांक आहोत.
तेव्हा आपण एकेक दाणा निवडून भरला तरच पोते भरेल. ज्याला ज्याला
मतदानाचा अधिकार आहे, त्याने अवश्य मतदान केले पाहिजे, तरच मी विजयी
"होईन -्
मी राखीव जागेसाठी उभा आहे. पण ज्या स्पृश्यांना माझे धोरण केवळ
अस्पृश्यांपुरतेच मर्यादित नसून, माझा दृष्टिकोन देशव्यापी आहे
असे वाटते, त्यांनीही मला मते द्यावीत. मी हे त्यांना सांगितले पाहिजे
असे नाही