३१८
दीपमालेतील न विझणाऱ्या दिव्याप्रमाणे, आमचा पक्ष [| ]
लहान असूनही इतर पक्षांना मार्गदर्शन करील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भंडारा निवडणुकीसाठी येतील त्यावेळेस | अस्पृश्यांनी आपली एकेक दिवसाची मजूरी जमवून सुमारे पाच हजार रुपयांची थैली त्यांना अर्पण करावी असा संकल्प पुलगाव येथील एका जाहीर सभेत प्रगट करण्यात आला होता.
' ज्या महान मानव श्ररेष्ठाच्या दर्शनाकरिता मध्यप्रदेशातील विशेषतः खेड्यापाड्यातील जनता कित्येक दिवसापासून आशा करीत आहे त्या महर्षी परमपूज्य डॉ. बाबासाहेबांचे, दलितोद्धारकाचे, अप्रतिम देश-सेवकाचे शुभागमन रविवार ता. २५ एप्रिल १९५४ रोजी पुलगाव (जिल्हा वर्धा) येथील नाचणगावरोड पावर हाऊसच्या भव्य पटांगणावर होईल, या शुभप्रसंगी परमपूज्य डॉ. बाबासाहेबांना पाच हजार रुपयांची थैली अर्पण करण्याचा निर्धार पुलगाव नगर शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या आगमन समितीतफे केला आहे. याकरिता या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन या पवित्र कार्यास प्रत्येक अस्पृश्य बंधु-भगिनींनी हस्ते परहस्ते, सढळ हाताने, स्वखुशीने तन-मन-धनाने मदत करुन निधी गोळा करण्याचा अधिकार असलेल्या ` कार्यकर्त्यांजवळच अधिकारपत्र पाहून निधी देण्याची कृपा करावी. वरील शुभ कार्यास सर्वत्र जनतेनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेबांच्या अमृततुल्य भाषणाचा फायदा घ्यावा ' असे ह. दा. आवळे, ऑर्गनायझींग व सुपरवायझींग सेक्रेटरी, मध्यप्रदेश शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन नागपूर, आणि आगमन स्वागत समिती, पुलगाव यांनी जनता ता. ३ एप्रिल १९५४ मध्ये प्रसिद्ध केले होते.
त्यानुसार रविवार, दिनांक २५ एप्रिल १९५४ रोजी पुलगाव (जिल्हा वर्धा) येथे मध्य प्रदेश इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या विस्तीर्ण पटांगणावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्कारार्थ एका प्रचंड सभेचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा विभागातील संसदीय पोटनिवडणूकीकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर या भागात निवडणूक प्रचारार्थ दौऱ्यावर आहेत. आपल्या आवडत्या नेत्याचे दर्शन घेण्यासाठी वऱ्हाडातून दूरदूरचे लोक मुद्दाम येथे आले होते.
जनता : १२ डिसेंबर १९५३, १ आणि १५ मे,१९५४.