१-७-१९५४ समाजाची दिशाभूल करणाऱया पुढाऱ्यांवर कडक नजर ठेवली पाहिजे - Page 433

समाजाची दिशाभूल . . . ....., ठेवली पाहिजे ३९३

किवा त्याबद्दलचे पैसे शिल्लक राहिले असतील त्यांच्याकडे जा. त्यांच्या सारखे पाठीशी लागून, त्यांच्याकडून सार्वजनिक कामाचा पैसा काढून योग्य माणसाकडे पोहचता करा. सार्वजनिक काम करताना, समाजाचा पैसा देताना किंवा घेताना कोणी आपणाला फसवीत तर नाहीना याचा संपूर्णपणे विचार करा. असा पैसा गोळा करणे व योग्य त्या व्यक्तिकडे पोहचता करणे हे तुम्ही तुमचे कर्तव्य समजले पाहिजे. कारण समाजाचा पैसा खाण्याची चाल अलिकडे फार बोकाळली आहे व त्याचा निदान मला तरी अत्यंत कंटाळा आला आहे. अशा लोकांना समाजातून हुडकून काढले पाहिजे व कोण समाजाला कशा धर्तीने फसवितो हे बारकाईने पाहिले पाहिजे

समाजात कार्य करणारी माणसे अत्यंत थोडी असतात. कार्याची कळकळ फार थोड्या माणसांना असते. सर्वजण कार्यकर्ते असते तर इमारत फंडासाठी एवढा आटापिटा करावयास लागलाच नसता, सामाजिक कार्याचा उमाळा फारच थोड्या लोकांना असतो. बाकीचे सर्वजण शेणातल्या किड्याप्रमाणे स्वतःच्या आनंदात मग्न असतात. तेव्हा अशा माणसाला टोचून ' तू शेणातल्या किड्याचे जीवन जगतो आहेस ' याची जाणीव करून देणे हे प्रत्येक सुशिक्षिताने आपले कर्तव्य समजले पाहिजे,

निदान आज तरी ' आंधळे दळते कुत्रे पीठ खाते ' अशी परिस्थिती समाजापुढे येऊन ठेपली आहे. आम्ही शेताची राखण व्हावी म्हणून खास कुंपणाची सोय केली. परंतु आता कुंपणच शेत खाऊन टाकायला लागले आहे. तेव्हा याला

काय म्हणावे. या बिकट प्रसंगाची जाणीव प्रत्येकास झाली पाहिजे,

समाजाची अशा धर्तीने दिशाभूल करणाऱ्या पुढाऱ्यावर कडक नजर ठेवली

पाहिजे. सामाजिक जीवनातील त्याच्या चळवळीवर बारकाईने लक्ष पुरविले पाहिजे. . थोडक्यात सांगावयाचे म्हणजे आजपासून तीन चार महिन्यांनी हीरक महोत्सवासाठी मी येणार आहे, तेव्हा इमारत फंड जितक्या लवकर जमा होईल

तितका बरा. कारण त्या कार्याला आता उशीर लावण्यात काही तथ्य आहे असे

मला वाटत नाही. म्हणून जागोजागी चाळ कमिठ्यामधून पैसा. गोळा

करा. ज्याच्याकडे पैसे राहिले असतील, पावत्या पुस्तके राहिली असतील ती गोळा करा. मी तुमच्याबरोबर आहेच.