२६-१०-१९५४ तुमची झोपडी जिवंत राहिली तर लोक तुमच्या आश्रयाला येतील - Page 435

तुमची झोपडी जिवंत . . , . तुमच्या आश्रयाला येतील ३९५

अगोदरसुद्धा अस्पृश्य चळवळीचे काम चालू होते. ही संस्था आजकालची नाही. ती काँग्रेसइतकीच नव्हे तर त्यापेक्षा जास्त जुनी आहे. काँग्रेसच्या आयुष्याला सुरूवात गांधीजींच्यापासूनच झाली, असे म्हणावयास हरकत नाही आणि ते साल देखील १९१९ सालच आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या सालापासूनच आम्हाला कॉंग्रेसशी विरोध करावा लागला आहे. तेव्हा तरी काँग्रेसशी विरोध करणे हेच कार्य ठरले होते. त्यांच्यापासूनच आपल्या हक्कांची पायमल्ली होत होती. शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशन हे तेव्हापासून टिकून राहिले -आहे. शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशन हा दगडाचा परंतु भक्कम किल्ला आहे. काँग्रेसचा किल्ला हा पैशावर उभारला आहे. लोकमान्य टिळक फंड आणि गुजराथी बंधूंची थैल्यांची मदत यावर हा किल्ला उभारला आहे. परंतु शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनचा किल्ला हा अस्पृश्य जनतेच्या भावनेवर उभारला आहे. हा किल्ला मोडू नये, अशी माझी पूर्ण इच्छा आहे. माझे शेड्यूल्ड कास्द्स्‌ फेडरेशनकडे गेली १० वर्षे दुर्लक्ष झाले. या १० वर्षाच्या गैरहजेरीत शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनमध्ये पुष्कळ मतभेद निर्माण झाले आहेत. यापूर्वी असले मतभेद नव्हते. प्रत्येक माणसाने फेडरेशनमध्ये गटबाजी सुरू केली आहे. प्रत्येकाने आपापले लहान लहान गट निर्माण केले आहेत. एकाचे वर्चस्व दुसऱ्यास नको आहे. यामुळे आपले लोक अजून तरी राजकारणात पक्के मुरले नाहीत. राजकारण म्हणजे काय ह्याची त्यास पूर्णपणे जाणीव नाही. आपल्या समाजात आपापसात फार मतभेद असतात. ते मतभेद ताबडतोब नष्ट होत नाहीत. त्या मतभेदाची झाडे त्यांच्या पोटात वाढू लागतात. त्यांचे मतभेद त्यांच्या मुलांच्याही पोटात वाढतात. अशा रीतीने मतभेद हे वाढत जातात. हा गुणधर्म आपल्या लोकात जास्त प्रमाणात आहे. काँग्रेससारख्या पक्षातसुद्धा मतभेद आहेत. त्याबरोबरच त्यांच्याजवळ काही सद्गुणही आहेत, असे अनुभवाने म्हणावे लागते. त्यांचा एक गुण फार महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे बहुमताने ठरलेले ते सर्व मान्य करतात. मग त्या गोष्टीचे विरोधकसुद्धा खोट्याचे समर्थन करू लागतात. ही कृती राजकारणात फार आवश्यक आहे. माझ्या मताप्रमाणे जर कारभार चालला तरच मी संस्थेत राहीन, अशी प्रवृत्ती फार वाईट. हम करे सो कायदा नको.

संस्थेत कोण मोठा ? डॉ. आंबेडकरांचे खालोखाल कोण ? वगैरे मतभेद फार वाढले आहेत. दलित फेडरेशनच्य' परिषदा होत नाहीत. इलेक्शन्स होत नाहीत, असे मी नेहमी कार्यकर्त्याकडून ऐकतो. हे सर्व खरे असले तरी त्याचा त्यांनी विचार केला आहे काय? या गोष्टीला लागणारा पैसा आमचेजवळ नाही. म्हणून परिषदा बोलावणे, इलेक्शन्स घेणे हे आम्हाला शक्य