२८-१०-१९५४ माझे आयुष्य तीन गुरू आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे - Page 440

४०० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

परंतु माझ्याविषयी दोन तीन गोष्टी मात्र निश्‍चित सांगता येतील. राजपुतान्यात महू मुक्कामी मी जन्मलो. त्यामुळे कोकणाचा माझा काही संबंध राहिला नाही. वडील कोकणातलेच. परंतु नोकरीमुळे त्यांना राजपुतान्यात जावे लागले. तेव्हा जन्म महू मुक्कामी झाला हे मात्र नक्की. दुसरी गोष्ट म्हणजे माझा जन्म बरोबर बाराच्या ठोक्याला झाला. त्यावेळी माझे वडील कामावर होते आणि माझ्या आईचं बाळंतपण चाललं होतं. माझा पिंड फार मोठा होता. माझ्या आईला फार त्रास झाला, असे म्हणतात. माझ्या वडिलांना चिता वाटत होती. परंतु एकदा दाईनी त्यांना येऊन सांगितले ' घरात जा. मुलगा

झाला. "'

तिसरी गोष्ट म्हणजे मी मूळ नक्षत्रावर जन्मलो आणि ज्योतिषाने सांगितले. की हे मूल फार वाईट आहे. याची आई लवकर मरेल. यामुळे इतर भावंडांना मी अतिशय अप्रिय झालो. जे ते मला झिडकारीत व म्हणत ' हे मूल आईला वाईट आहे ' शेवटी आमची आई लवकरच वारली. ह्या अशा माझ्या जन्माविषयी तीन गोष्टी सांगता येतील.

माझं बालपण म्हणाल तर माझं मलाच आश्‍चर्य वाटतं. मी बारा-तेरा वर्षाचा होईपर्यंत सर्व लोकांना अशी खात्री वाटत होती की हे पोर घराण्याला काळिमा लावणार. याच्या हातून काही होणार नाही. कारण मी बारा-तेरा वर्षाचा होईपर्यंत लंगोटीशिवाय दुसरी वस्तूच नेसलो नाही (हंशा) शिवाय दारोदार गावच्या बायकांना विचारी की “ तुमची लाकडं फोडायची आहेत काय ?'' मला शिक्षणात प्रथम काही राम वाटेना. आइ वारल्यावर माझं संगोपन आत्याने केले. मला वाटे शिकून काय करणार ? सहा महिने मी माळ्याचा धंदा

केला. मिलिटरी कँपात बागबागाईत असायची. तेथील माळ्याच्या पोराशी संगत केली. माती, दगड उचलले. जागा साफ केली, नळानं पाणी बागेला द्यायचं होतं पण ते काही होईना. तेव्हा मी घरावरची सर्व कौलं काढली आणि त्याच्या नाल्या केल्या होत्या. काय पण माझं आयुष्य असं वाटतं.

साताऱ्याला जेव्हा आम्ही होतो तेव्हा इतर सुभेदार नातेवाईकही होते. त्यांच्या घरासमोर एक उकिरडा होता, शेणकचरा होता आणि त्या उकिरड्यावर एक उंबराचं झाडही होतं. मी झाडावर चढण्यात फार पटाईत. वानर देखील इतक्या लवकर चढणार नाही. आता पायाने अशक्त झालो. त्या झाडावर मी चढे आणि त्यावर कांबळ टाकून झोपत असे, व लहर आली की त्या उकिरड्यावरील राखेत उडी घेत असे. त्यावेळी साताऱ्याला प्लेग आला