माझे आयुष्य तीन गुरू आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे ४०१
होता. लोक म्हणत, बरेच लोक प्लेगने मेले आणि या पोरालाच प्लेग का होत नाहो. ही अशी माझी परिस्थिती ! एकदा कसाई तीन रुपयाला बकरी देईनात. तेव्हा आम्ही उगारणी केली आणि दोन बकऱ्या घेऊन आलो. तेव्हा लांब बांबू घेऊन आम्ही बकऱ्यांना चारा घालीत असू रस्त्यात कोणी ह्या बकऱ्या चांगल्या नाहीत म्हणून सांगितलं. बिन शिंगाच्या बकऱ्या चांगल्या म्हणे. असं हूडपणाचं माझं बालपण गेलं.
घरात बऱ्याच लोकांनी लडिवाळपणानं वागवलं. आमची आत्या होती. तिचा मी फारच लाडका. तिने सर्वाना ताकीद दिली होती. ' आईविना पोरगं आहे. त्याला धुसफूस करू नका ' आणि यामुळेच मी स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला. सर्वाना वाटे की ह्या पोराच्या हातून काही होणार नाही. ज्यांनी माझे लालन पालन केले त्यातील कोणी जगली नाहीत. ते आज हे माझे कोतुक पाहायला हजर असते तर मला फार आनंद झाला असता. अशा प्रकारे माझे बालपण गेले. तुम्हाला कल्पना असेल आयुष्यात किती क्रांती झाली. मी गुराखी झालो असतो किंवा काबाडकष्ट करणारे काम केले असते तर ह्या पदाला पोहोचलो नसतो. माझे वडील मला नेहमी सांगत ' सावलीतले काम शीक ' या साऱ्या आठवणी एकत्र करून एक चरित्र लिहावे असा माझा विचार आहे. ( टाळ्यांचा कडकडाट ) पण चरित्र नाही तर एक लहानसे ' माझं बालपण ' म्हणून चरित्रपर पुस्तक लिहिणार आहे. _ त्यात सर्व गोष्टी मी सविस्तर देईन.
माझ्यामध्ये काही उपजत गुण होते आणि म्हणून मी या पदाला पोहोचलो, असं काही नाही. माझं आयुष्य जसं चाललं तसं चालू दिलं असतं तर मी एक नीतियर माणूस झालो असतो. पण मला माझी पूर्ण आठवण होती. माझ्या आयुष्याला जे काही वळण मिळालं ते का मिळालं, कसं मिळालं, याचे कारण
मी देणार आहे.
माझे तीन गुरू आहेत. प्रत्येकाला गुरू असतातच, तसे मलाही आहेत. मी काही सन्याशी नाही की बैरागी नाही. पण मला गुरू आहेत. माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरू बुद्ध होत. मी दहा बारा वर्षाचा असेन. माझे वडील कबीर पंथी साधु होते. हे मला तेव्हापासून आठवतं. ` माझ्या वडिलांचं घर धर्मासन म्हणता येईल, तसेच विद्यासन असंही म्हणता येईल. माझे वडील विद्येचे भक्त होते, तसेच ते धर्माचे चाहते होते. माझ्या लहानपणी रामायण, महाभारत इत्यादी