माझे आयुष्य तीन गुरू आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे ४०३
यानंतर माझी तीन उपास्य दैवतेही आहेत. कोणाची मरीआई, खंडोबा, अशी दैवतं असतात, तशी माझी तीन दैवतं आहेत. माझे पहिले दैवत विद्या होय. विद्येशिवाय मानवाला शान्तता नाही आणि माणुसकीही नाही. विद्या ही सर्वांना अवगत झाली पाहिजे. ती महासागरासारखी आहे. बुद्धाने एकदा म्हटले आहे की बुद्ध धर्म हा शुद्ध धर्म आहे. येथे भेदभाव नाही. श्रमण, भिक्षु, ब्राह्मण, भंगी मग तो कोणीही असो, सारे एक आहेत. माझ्या संघात थेण्यापूर्वी नदी नाला, मग नाव कोणतेही असो, यमुना असो, ब्रह्मपुत्रा, गंगा, गोदावरी कोणतीही नदी असो, ह्या सर्व नद्या आपल्या प्रांतातून सागरात भेल्या. त्यांचं पाणी एक झालं की हे पाणी मग सांगता येणार नाही की हे यमुनेचं
की हे गंगेचं, की हे गोदावरीचं ! तेव्हा माझा संघ हा महासागरासारखा
आहे. जात पात नाही. तुम्ही सर्व एक आहात. तुझी विद्येची आवड आहे भा मग ती सफल कर. ज्याप्रमाणे माणूस जगायचा असला तर अन्नाची आवश्यकता आहे तशीच विद्येचीही आवश्यकता आहे. ज्ञानाशिवाय तो काय क्रू शकेल ? ब्रह्मदेशात शेकडा ९० लोक सुशिक्षित आहेत. आज हिन्दुस्थानात शेकडा ९० लोक निरक्षर आहेत. याचे कारण ब्राह्मणांनी आम्हाला विद्या दिली नाही हेच होय. धर्माचे कायदे आमच्या आंड आले आणि आमची विद्या हिरावून घेतली. आपले लोक समजत की दगड ही विद्या. म्हणून आपल्या धार्मिक समजुती अतिशय रसातळास गेल्या. दगडाची पूजा करणारे भाविक आमच्यात सर्वच लोक आहेत. तुकोबाने एके ठिकाणी म्हटलं आहे, नवस
सायासे कन्या पुत्र होती ! तरी कासया करणे लागे पती !! याचे कारण त्यांना
विद्या दिली नाही. अत्यंत मोठी वस्तू आहे ही विद्या. माझे विद्येचे वेड भयंकर
आहे. ब्राह्मणाच्या घरी नाहीत इतकी पुस्तके आता दिल्लीला मजजवळ
आहेत. एकूण तीस हजार पुस्तके आहेत मजजवळ ! आहेत कोणा
ब्राह्मणाजवळ ? दाखवून द्यावीत त्याने! ठाकूर आणि कंपनीची माझ्यावर
हजाराची उधारीची बीलं थकलेली आहेत. मला उधारीचा माल कुठेही मिळतो. जिथं माझी उधारी थकली तिथं मी दारातच मोटार उभी करतो, इतके
माझं विद्येविषयीचं वेड आहे. हे वेड सर्वाना पाहिजे. एखाद्याची रांड असते
ना! ती दुसऱ्या गावाला असते. समजा, रात्री बारा वाजता त्याला आठवण
येते. मग तो रात्रीचा उठून स्मशान पाहत नाही, काही पाहत नाही, तो तिच्या घरी जाणारच ! एवढं जेव्हा पुस्तकावर प्रेम होईल तेव्हाच तो विद्येचा खरा
पुजारी होईल. मी विद्येची पूजा २४ तास करीत असतो.
माझे दुसरे दैवत स्वाभिमान होय. मी कोणाची याचना केली नाही. माझं
ध्येय असं होतं की पोट तर भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवाही केली
पाहिजे. डॉ. परांजपे यांच्या विनंतीने एका महाविद्यालयात एकॉनॉमिक्सचा