४०४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
प्रोफेसर झालो. तेव्हा मला त्यांनी तेरा व्याख्यानं देण्यासाठी सांगितले. मी म्हणालो फक्त चार व्याख्यानं देईन. पटलं तर ठेवा नाहीतर माझा मार्ग मला मोकळा आहे. कारण मला माझ्या लोकांची सेवा करावयाची होती, त्यासाठी वेळ हवा होता. पोयबावडीच्या नाक्यावरच्या ४८ व ५० नंबरच्या खोलीत मी कण्याचा भात आणि कण्याची भाकरी खाल्ली. पण समाज सेवेला सोडून भारी पगाराकडे वळलो नाही. मार्ग निघाला. लोकांनी थैली स्वीकारून घरं बांधली. माझ्या माहितीच्या एका पुढाऱ्याने म्हणे ४७ हजाराच्या प्रॉमिसरी नोटा लिहून दिल्या होत्या आणि लोकांनी जेव्हा लाखभर रुपयांची थैली अर्पण केली तेव्हा ते फेडले. मला तसे करायचे नाही. मी माझे स्वत:चे पोट स्वतःच भरून जी काही सेवा करायची ती केली. नोकरी मला करायची नव्हतीच. कोणीही गव्हर्नर जनरल येवो त्याच्याशी माझी मैत्री असे. परंतु मी कोणाजवळही याचना केली नाही की मला अमुक बनवा किंवा मला ही जागा द्या. हो, दुसऱ्यासाठी मी. काही केलं असेल पण स्वतःसाठी एक बोट भर चिट्टी लिहिल्याचं कोणीही दाखवून द्यावं. एक्झिक्युटिव्ह कौन्सिलर व्हावं ही मात्र माझी दांडगी इच्छा होती; ती पुरी झाली. आता मला ना पेन्सन, ना पगार, ना प्राव्हिडंड फंड ! काही नाही. एकदा इंग्रजांच्या राज्यात कौन्सिलरशिप पत्करली. एकदा काँग्रेसच्या राज्यात. पण लेथेही काँग्रेसशी माझा खटका उडाला. मला जज्ज होता आलें असतं. पण अडकून घेऊन करणार काय ? तेव्हा माझं सागणं हेच की दीनतो असू नये. मी काही तरी आहे असं मानलं पाहिजे. मी परमेश्वराला देखील कमी मानतो इतका माझा स्वाभिमान तळपता आहे.
आणि माझं तिसरं दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धीकरिता पाप केलं, असं मला आठवत नाही. याबद्दल मला मोठा अभिमान वाटतो. मी विलायतेला अनेक वेळा गेलो. पण अजून दारू प्यालो नाही, विडी प्यालो नाही. मला कसलं व्यसन नाही. पुस्तक आणि कपडा या गोष्टी अधिक प्रिय आहेत. शील संवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे, हे मला सांगायला फार अभिमान वाटतो. अशाप्रकारे माझे तीन गुरू आणि तीन उपास्य दैवतं आहेत. यांचा मी बनलेला आहे. या पदाला मी पोहोचलो हे त्यांच्याच शक्तिमुळे होय. मी मात्र केवळ कारण आहे. त्यांचा मी बनलेला एक पुतळा आहे. तेव्हा यांचं अनुकरण करा. तुम्ही माझा समारंभ केलात तो व्यक्ती करिता केला नसून या तीन दैवतांचा आदर्श म्हणून त्यांचा कृतार्थ होण्यासाठी केलात असं म्हणून मी ही थैली स्वीकारीत आहे.
१९१९ सालापासून म्हणजे गांधींनी पाय टाकला तेव्हापासून मी राजकारणात आहे. तरीही त्यांचं माझं जुळलं नाही. अनेक प्रकारच्या खटापटी आम्ही केल्या. महाडचा पाण्याचा सत्याग्रह, नाशिकचा मंदीर प्रवेशाचा सत्याग्रह,