३२५
राष्ट्राच्या लष्करी संरक्षणासाठी हैद्राबाद ही भारताची
उपराजधानी असणे आवश्यक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सौ. माईसाहेब आंबेडकर यांच्यासमवेत हैद्राबाद येथील बेगमपेठ विमानतळावर तारीख १४ नोव्हेंबर १९५४ रोजी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी आगमन झाले. त्यांच्या स्वागताप्रित्यर्थ सिकंदराबाद शे. का. फे. चे अध्यक्ष श्री. यादगीरवार, मराठवाडा शे. का. फे. चे सहचिटणीस श्री. व्ही. एल. सुरवसे, बीड जिल्हा शे. का. फे. चे अध्यक्ष श्री. व्ही. जे. आरक, औरंगाबाद जिल्हा शे. का. फे. चे सहचिटणीस श्री. ए. एम. साळवे, औरंगाबाद कॉलेजचे रजिस्ट्रार श्री. बी. एच. वराळे, हैद्राबाद राज्याचे अर्थमंत्री श्री. विनायकराव विद्यालंकार इत्यादी सद्गृहस्थ हजर होते.
प्रारंभी शे. का. ट्र. फं. होस्टेलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी व कै. व्यंकटराव होस्टेलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब द सौ. माईसाहेब यांना पुष्पहार अर्पण केले. उपस्थित जनसमुदायाने '' डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय ', '' आंबेडकर झिंदाबाद “, “ शे. का. फे. चा विजय असो '' आदि घोषणा करून वातावरण दुमदुमून सोडले. नंतर त्यांना परसियस हॉटेलमध्ये नेण्यात आले.
त्यानंतर त्यांनी मराठवाडा साहित्य परिषद व मराठी ग्रंथसंग्रहालय या संस्थांना भेट दिली. त्यांचा या दोन संस्थांच्या प्रमुखांकडून सत्कार करण्यात आला व सुमारे दीड तास त्यांनी विविध विषयांवर औपचारिक चर्चा केली.
भाषावार प्रांतरचनेवर बोलताना ते म्हणाले,
भारतातील सर्व भाषिक प्रांतात अत्यंत दुर्दैवी प्रांत जर कोणता असेल तर तो महाराष्ट्र होय. महाराष्ट्र इतरांकडून संपूर्णपणे नागवला गेला. सर्वांनी महाराष्ट्रीयांचे यथेच्छ दमन केले. महाराष्ट्रावर गुजराती-मारवाड्यांचे अबाधित वर्चस्व आहे, तर इकडे हेद्राबादेतील मराठवाड्यावर तेलगू लोकांचे आहे. वऱ्हाड तर हिन्दी भाषिकांना आपली वसाहतच वाटत आली आहे. याला कारण महाराष्ट्रीयांचे दुबळेपण. त्यांच्यात काहीच प्राण उरलेले नाही. दिल्ली जिकायच्या केवळ बाताच ते उठल्या-सुटल्या मारीत असतात. ५०/६० रुपयांच्या कारकुनीखेरीज त्यांना इतर काहीच करता येत नाही. परंपरा
जनता : २७ नोव्हेंबर १९५४.