१४-११-१९५४ राष्ट्राच्या लष्करी संरक्षणासाठी हैद्राबाद ही भारताची उपराजधानी असणे आवश्यक - Page 447

राष्ट्राच्या लष्करी संरक्षणासाठी . . , . उपराजधानी असणे आवश्यक ४०७

पुष्कळ चांगली आहे; पण केवळ दिव्य भूतकाळ असून काय उपयोगाचा ? आमचे तथाकथित पुढारी गप्पा तर खूप मर्दुमकीच्या मारतात, पण एक जणही महाराष्ट्राच्या उत्कर्षाकरिता त्याग करावयास तयार नाही. प्रत्येकाला वाटते, जवाहरलालजी काय म्हणतील ? अमुक काय करतील ? या भीतीनेच सर्व पछाडलेले आहेत. ही काय लोकशाही ? याला का विवेक म्हणायचा ? आज ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांना लोकशाहीवृत्तीचा स्पर्शही झालेला नाही. त्यांना वाटेल तसे ते करतात व करतील, त्यांना वाटेल तर संयुक्त महाराष्ट्र होईल.

सर्व दृष्टीने मुंबई शहर हे महाराष्ट्राचेच आहे. मुंबईवर आज गुजराती, पारशी व मारवाडी इत्यादी महाराष्ट्रीयेतरांचे वर्चस्व आहे. पण असे वर्चस्व देशातील सर्वच मोठ्या शहरांवर आहे. मद्रास, कलकत्ता वगैरे सर्वच मोठ्या शहरांची कमी अधिक प्रमाणात अशी स्थिती आहे. मद्रासमध्ये आंध्रच्या हाती ३० टक्क्याहून अधिक व्यापार आहे. इतरांच्या मानाने लोकसंख्याही आंध्राची अधिक आहे. पण इतके असूनही भौगोलिक दृष्टीने मद्रास, आंध्रला मिळालेले नाही. कलकत्त्याचेही उदाहरण बघण्यासारखे आहे. कलकत्त्यावर बंगाल लोकांखेरीज, आसामी, उरीया वगैरे परप्रांतीय लोकांचाच व्यापारी व आर्थिक दृष्टीने ताबा आहे. बंगाली बाबू तेथे निव्वळ कारकुनी व मोलमजूरी करतात. असे असताही कलकत्ता बंगालचाच आहे. मग मुंबई हीच महाराष्ट्राची नाही, असे म्हणणे आंधळेपणाचे व अन्यायाचे आहे.

मुंबई महाराष्ट्राला मिळेल. त्यांना निराळे वाटले तर ते चक्क करून दाखवतील व तुम्हाला म्हणतील, तुम्ही कोण आम्हाला विचारणार ? तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, त्यांचे खरेही आहे. कारण त्यांना माहीत आहे की कारकुनांची ही जात आपले काय करणार आहे ? शिवाय आजची लोकशाही

आणि दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुका त्यांच्या पाठीशी आहेतच. आमच्या

या लोकशाहीत निवडणुकीची तिकिटे चक्क विकत मिळतात. जो जास्त पैसे

देईल, लांड्यालबाड्या करील तो निवडून येईल आणि ५ वर्षे मजा

करील. ज्यांच्याजवळ भरपूर पैसा नाही त्यांनी स्वस्थ बसावे आणि घडेल त्याला

लोकशाही म्हणून आशिर्वाद द्यावा.

राष्ट्राचे लष्करी संरक्षण आणि सत्तेच्या यंत्रणेत समान वाटा यादृष्टीने

दक्षिणेत भारताची उपराजधानी असणे अवश्य आहे. माझे फार दिवसांचे मत

आहे की हैद्राबाद, सिकंदराबाद व बोलाराम हा सर्व भाग मध्यवर्ती सरकारने

ताब्यात घेतला पाहिजे व तेथे उपराजधानी कायम केली पाहिजे. दिल्लीला