४०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
बसून सरकार राज्य हाकू म्हणते तेव्हा मला त्याच्या लष्करी निपुणतेचे हसू येते. आमचे राष्ट्र लष्करी बनवावयाचे असेल तर दक्षिण भारतात उपराजधानी ठेवणे संरक्षणाच्या दृष्टीने किमान गरजेसाठी अवश्य आहे. आज मध्यवर्ती सरकारात उत्तर भारतीयांचे वर्चस्व आहे. अध्यक्ष व पंतप्रधानांची दोन प्रांतातील बड्या व्यक्तीत आळी-पाळीने अदलाबदल होत राहाणार आहे. दक्षिण भारतातील सामान्य लोक सध्या सुद्धा नोकऱ्याकरिता दिल्लीला जाणे शक्य नाही व यंत्रणेत त्यांना वाटा मिळणेही त्यामुळे दुरापास्त आहे. भारतीय सर्व एक हे जरी खरे असले तरी व्यवहारात ही भावना निरर्थक आहे. राजकारणात हे औदार्य अंगलट येते व भोळ्याभाबड्यांचा घात होतो. यासाठी हैद्राबादेत उपराजधानी आली तर दक्षिण भारतीयांना सरकारी यंत्रणेत स्थान मिळेल. सत्तेत इकडील लोकांनाही भाग घेता येईल. आमच्या डोक्यात हा
व्यवहार येत नाही.
' लिटरेचर ' या इंग्रजी शब्दाचे ' साहित्य ' हे चूक भाषांतर आहे. साहित्य स्वयंपाकाचे असते, हजामतीचे असते. त्या अर्थाने साहित्य या शब्दाची येथे समर्पकता पटणारी नाही. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकारामाची गाथा वगैरे आपण वाचतो. ज्ञानेश्वर. मोठा विद्वान होता. पण माझी एक शंका आहे. सर्व ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरांनी वेदान्त विषयावर भाष्य केले. ब्रह्म हे सत्य आहे व ते सर्वव्यापी आहे. असे ज्ञानेश्वर म्हणाले. पण ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी चातुर्वर्ण्याचे हिरीरीने समर्थन केले. ज्ञानेश्वर व त्याच्या इतर भावंडांना ब्राह्मणांनी जातीबहिष्कृत केले होते. त्यांना पुन्हा जातीत जावयाचे होते. यामुळेच त्यांनी रूढ चाततुर्वरण्याच्या कल्पना उचलून धरल्या व समाजदंडापुढे कच खाल्ली. ब्रह्म जर सर्वव्यापी आहे तर ज्ञानेश्वर असे म्हणू शकले असते की तुम्ही मला बहिष्कृत केले तर मी महारवाङ्यात राहील. त्यांच्यातही ब्रह्म आहे. पण असे म्हणण्याऐवजी त्यांनी रेड्यामुखी वेद बोलविले. हा रेडा तेव्हापासून मात्र मुका झाला आहे.
इंग्लंडच्या लोकशाहीमागे शेकडो वर्षांची परंपरा आहे. तेथील सर्वसामान्य समाजातील सर्व अपप्रवृत्ती नष्ट झाल्यावर तेथे प्रौढ मतदानाचा हक्क मिळाला. आमच्या येथे लोकांचे अज्ञान, हेच प्रौढ मतदानाच्या अधिकाराचे अधिष्ठाण झालेले आहे. लोकांना व त्यांच्या प्रतिनिधींना कसलेच ज्ञान नाही. यामुळे या पोकळ लोकशाहीच्या चौकटीचा लबाड, संधिसाधू व हितसंबंधी लोक फायदा घेतात. पदवीधर होण्यासाठी मॅँट्रिकच्यानंतर चार वर्ष अभ्यास