राष्ट्राच्या लष्करी संरक्षणासाठी . . , . उपराजधानी असणे आवश्यक ४०९
करावा लागतो. क्रमाक्रमाने पदवीधर बनतो. पण लोकसभेचे, विधिमंडाळाचे सभासद होण्यास अगर मंत्री बनण्यास आमच्या लोकशाहीत क्रम नाही. कसे तरी करून कोणी तरी निवडून यायचे, हजार भानगडी करून एका रात्रीतून मंत्रीपदापर्यंत पोचायचे, अशी विचित्र दशा आहे आमच्या राजकारणाची. अशारितीने निवडून येणाऱ्याच्या हातून लोकशाही परंपरा कशी निर्माण होणार आहे. येणाऱ्या २० वर्षापर्यंत समाजाची शैक्षणिक, बौद्धिक व वैचारिक पातळी एकसूत्रीपणे वाढविली पाहिजे. लोकांना समजावून सांगून त्यांना पटवून देण्याची पद्धती ( Persuasive met१०५ ) अधिक वापरली पाहिजे. ही हुकूमशाही वाटेल, पण ती अवश्य आहे. ( श्रोत्यांपैकी एकाने रशियातील हुकूमशाही ४० वर्षापासून अबाधित राहिलेली असून तिची मिठी अधिकाधिक घट्ट होत असल्याचे सांगितले. तशाच रीतीने हुकूमशाही भारतातही कायम स्वरूप धारण करणार नाही का ? असे विचारले असता,) बाबासाहेब म्हणाले, धोका तर निश्चित आहे, पण धोका नाही कोठे ? आमची लोकशाही धोक्यापासून मुक्त आहे काय ? रशियात आजही हुकूमशाही ठेवणे मला अयोग्य वाटते. या प्रदीर्घ काळाचा खरे म्हटले तर रशियाने खरीखुरी लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्य प्रस्थापित करण्याकरिता उपयोग करून घ्यावयास हवा होता. परंतु तसे तेथे झालेले नाही. हुकूमशाहीतील हा धोका मला मान्य आहे पण लोकशाहीसाठी लागणारी अनुकूल जागृती व परंपराच आमच्या येथे आहे कोठे ? अंधश्रद्धा, रूढिप्रियता वगैरे दोषांमुळे आमचा समाज दृष्टिहीन बनला आहे. |
कुंभमेळ्यात नागव्या साधूंच्या पायाखाली हजारो नागरिक तुडवून मेले. ही घटना काय दर्शविते ? मी मंत्री असतो आणि अधिकार माझ्या स्वाधीन असते तर मी या साधुंना सेना पाठवून हाकून लावले असंते. अवश्य असते तर गोळीबारही केला असता. गिरिकंदरात राहाणाऱ्या या साधुंना लोकात यावयाचे असेल तर त्यांनी वस्त्रे लेवून नीट रीतीने आले पाहिजे. पण आमच्या राज्यकर्त्यांनी या प्रसंगी काय केले? लोकांच्या धार्मिक अंधश्रद्धांचा लोकप्रियतेसाठी त्यांनी त्यांचा चक्क वापर केला.