१४-११-१९५४ अपुरे विद्यार्जन उपयोगाचे नाही - Page 451

अपुरे विद्यार्जन उपयोगाचे नाही ४११

कापतो तर शीलवान मनुष्य तरवारीने कुणाचे रक्षण करतो. त्यासाठी धर्मशील बनले पाहिजे. रोज सकाळ-संध्याकाळ सामुदायिक वंदना करून बौद्धतत्त्वाची उपासना केली पाहिजे. दर आठवड्याला वादविवादात्मक विषय ठेऊन कोणाला तरी बोलावून त्यावर व्याख्याने करविली पाहिजेत. तुम्हाला जगात कसे राहावे हे शिकविले जात आहे. तेव्हा सुटीत घरी गेल्यावर आरोग्य व स्वच्छता याविषयी आई-वडीलांना माहिती सांगून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्या तुमच्या बोडिंगला जी आर्थिक मदत मिळत आहे ती तळ्यातील पाण्याप्रमाणे आहे. ती केव्हाना केव्हा आटणार हे निश्‍चित. यासाठी सरकारने कायम स्वरुपाच्या मदतीची सोय केली पाहिजे.