३२७
कोणत्याही निष्णात पंडिताने
बौद्ध धर्माच्या तत्त्वाविषयी माझ्याशी चर्चा करावी
मी त्याचा पराभव केल्यावाचून राहाणार नाही
श्री. फुन्ग, व्हीचार्न ऑफ थायलंड यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ४ डिसेंबर १९५४ रोजी रंगून येथे तिसऱ्या जागतिक बौद्ध धर्माच्या अधिवेशनास रीतसर सुरूवात झाली. सदर प्रसंगी अमेरिका, इंग्लंड, सिलोन, मलाया, जर्मनी, फ्रांस, इन्डोनेशिया इत्यादी राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी बौद्ध धर्म व त्याची शिकवण या विषयावर उद्बोधक भाषणे केली. अध्यक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची
ओळख हिंदुस्थानातील प्रतिनिधींचे पुढारी व तेथील सात कोटी दलितांचे नेते या
नात्याने करून देऊन त्यांचा गौरव केला,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुमारे पन्नास मिनिटे अस्खलितपणे भाषण केले. आपल्याला या पवित्र ठिकाणी अधिवेशनास बोलाविल्याबह्दल त्यांनी येथील चालक मंडळीचे प्रथम आभार मानले.
ते आपल्या भाषणात म्हणाले,
या ठिकाणी जमलेले आपण सर्व बुद्धअनुयायी आहोत. जगातील इतक्या राष्ट्रातून बौद्धधर्म प्रचलित असला तरीदेखील त्याचा प्रचार जितक्या झपाट्याने व्हायला पाहिजे तितका झालेला नाही हे मला मोठ्या खेदाने म्हणावे लागते. आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व राष्ट्रांमध्ये सिलोन आणि ब्रह्मदेश ही दोन राष्ट्रे बौद्धधर्माभिमानी या दृष्टीने बरीच आघाडीवर आहेत असे दिसते. परंतु माझ्या दृष्टीने या दोन्ही राष्ट्रांची बौद्धधर्माच्या प्रचाराची कार्य- पद्धती अगदीच वाखणण्याजोगी नाही.
येथील श्रीमंत स्त्रियादेखील खूप पैसे दान देतात. धर्माच्या नावाने जमा होणारे हजारो रुपये ते धार्मिक उत्सवप्रसंगी निरर्थक खर्च करतात. घरादारांना व झाडांना विजेचे दिवे लावून हवी ती आरास करण्यात हे पैसे खर्च होतात. त्याऐवजी धर्मासाठी खर्च होणारा पैसा बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी खर्च झाला पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे. ऐश्वर्य नि शोभा या गोष्टी भगवान
जनता : १८ डिसेंबर १२५४.